विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Kadam शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. मात्र त्यांनादेखील वर पाठवले नव्हते, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केले होते.Ramdas Kadam
रामदास कदम पत्रकार परिषदेत म्हणाले “बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले होते, हे डॉक्टरांना विचारायला हवे. मी दसरा मेळाव्यात जबाबदारीने विधान केले आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. मला प्रसिद्धी नको आहे. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. आमच्या दैवताबाबत असं होत असेल तर आम्हाला दु:ख होणारच आहे.Ramdas Kadam
कदम म्हणाले, त्यावेळी शरद पवार यांनी एक विधान केले होते. अरे मिलिंद बाळासाहेब ठाकरे यांच्या देहाला उद्धव का त्रास देत आहेत, असे त्यावेळी शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांचे हे शब्द होते. मला अजूनही आठवत आहे. त्यावेळी मी मातोश्रीमध्येच होतो.Ramdas Kadam
शिवसेनाप्रमुखांचे निधन कधी झाले? त्यांची पार्थिव किती दिवस ‘मातोश्री’त ठेवले होते? शिवसेनाप्रमुखांच्या हाताचे ठसे घेतल्याची चर्चा ‘मातोश्री’त होती. परंतु ठसे कशासाठी घेतले होते? असे सवाल रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केले होते.
मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिपाई आहे. उद्धव ठाकरे काय आहेत, ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल. उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन बोलावे. मग मीदेखील बोलतो. एकदा होऊनच जाऊदे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले आहे.
Sharad Pawar was also not allowed to meet Shiv Sena chief Balasaheb Thackeray, alleges Ramdas Kadam
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ




















