विशेष प्रतिनिधी
वडोदरा : वडोदरा पोलिसांनी हिंदू देवतांबाबत अवमानकारक वक्तव्ये करणारा आणि व्हिडिओ पोस्ट करणारा यूट्यूबर निलेश नानजी जिटिया याला अटक केली आहे. आरोपी वडोदऱ्यातील खोदियारनगर परिसरातील रहिवासी असून, त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हिंदू देवतांचा अपमान करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. YouTuber
हा व्हिडिओ समजताच काही नागरिकांनी त्याच्याशी संपर्क साधून तो काढून टाकण्याची मागणी केली. मात्र, जिटियाने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी करण सोलंकी यांनी बापोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या चॅनेलवर अनेक व्हिडिओ अपलोड केले होते ज्यात हिंदू देवतांबाबत अपमानास्पद मजकूर होता. काही दिवसांपूर्वी त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान श्रीराम यांच्या छायाचित्रांसह अपमानजनक वक्तव्ये केली होती. त्यानंतर तो सोशल मीडियावर लाइव्ह येऊन पुन्हा हिंदू देवतांबाबत अवमानकारक टिप्पणी करत होता.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
YouTuber arrested for posting derogatory video about Hindu deities
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ




















