पंतप्रधानांची भावनिक पाेस्ट, उलगडला मुख्यमंत्रीपदापासूनच दाेन तपांचा प्रवास

पंतप्रधानांची भावनिक पाेस्ट, उलगडला मुख्यमंत्रीपदापासूनच दाेन तपांचा प्रवास

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरातच मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दाेन तपांपूर्वी म्हणजे २४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शपथ घेतली हाेती. सत्तेचे पहिले पद त्यांनी स्वीकारले. अत्यंत भावनिक पाेस्ट करून पंतप्रधानांनी दाेन तपांतील त्यांच्या अनुभवांना उजाळा दिला आहे.

७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. १३ वर्षे गुजरातचे नेतृत्व केल्यानंतर २०१४ मध्ये पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले. तेव्हापासून त्यांनी सलग तीनवेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला आहे. या प्रसंगी त्यांनी देशवासीयांचे आभार मानत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या X वरील पोस्टमध्ये लिहिले, “आजच्याच दिवशी २००१ मध्ये मी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. देशवासियांच्या आशीर्वादाने आज मी शासनप्रमुख म्हणून सेवेसच्या २५व्या वर्षात प्रवेश करत आहे. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. देशातील लोकांचे जीवनमान उंचावणे आणि भारताच्या प्रगतीत आपले योगदान देणे, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे.

नरेंद्र मोदींनी नमूद केले की, “२००१ मध्ये पक्षाने माझ्यावर गुजरातची जबाबदारी सोपवली, तेव्हा गुजरात अत्यंत कठीण परिस्थितीत होता. त्याच वर्षी प्रचंड भूकंप झाला होता, त्याआधी चक्रीवादळ, सततचा दुष्काळ आणि राजकीय अस्थिरता अनुभवली होती. या सर्व संकटांनी मला अधिक दृढ बनवले. जनतेच्या सेवेसाठी आणि गुजरातच्या पुनर्निर्माणासाठी मी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार केला.”गरीबांसाठी काम कर आणि कधीही लाच घेऊ नको…मोदींनी आपल्या आईने दिलेल्या दोन शिकवणींची आठवण करुन दिली. “जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझ्या आईने सांगितले ‘मला तुझ्या कामाचे फार ज्ञान नाही, पण दोन गोष्टी लक्षात ठेव: एक, नेहमी गरीबांसाठी काम कर आणि दोन, कधीही लाच घेऊ नको.’ मी लोकांनाही सांगितले की, माझा प्रत्येक निर्णय प्रामाणिक हेतूने आणि शेवटच्या माणसाच्या सेवेसाठी प्रेरित असेल.

मोदी पुढे म्हणाले, “जेव्हा मी मुख्यमंत्रीपद स्वीकारले, तेव्हा सर्वत्र निराशा होती. लोकांना वीज, पाणी, रोजगाराचा अभाव होता, कृषी आणि उद्योग क्षेत्र अस्थिर झाले होते. त्या स्थितीतून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गुजरातला ‘गुड गव्हर्नन्स’चे पॉवरहाऊस बनवले. गुजरात, जो पूर्वी दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जात होता, तो कृषी उत्पादनात देशातील अग्रगण्य राज्य ठरला. व्यापार संस्कृतीचे रूपांतर मजबूत औद्योगिक आणि उत्पादन क्षमतेत झाले. वारंवार लागणारे कर्फ्यू संपले आणि सामाजिक तसेच भौतिक पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली.

२०१३ मध्ये मला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्या काळात देशात शासनावरचा विश्वास कमी झाला होता आणि यूपीए सरकारवर भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि धोरणात्मक अपयशाचे आरोप होते. त्या काळी भारताला जागतिक पातळीवर कमजोर दुवा मानले जात होते. परंतु भारताच्या जनतेने आमच्या आघाडीला प्रचंड बहुमत दिले. ३० वर्षांनंतर प्रथमच एका पक्षाला केंद्रात पूर्ण बहुमत मिळाले.

गेल्या ११ वर्षांत आपण सर्व भारतीयांनी मिळून अनेक परिवर्तन घडवले. आपल्या नारीशक्ती, युवाशक्ती आणि मेहनती अन्नदात्यांनी देशाला बळ दिले आहे. २५ कोटींहून अधिक लोक गरीबीच्या चक्रातून बाहेर आले आहेत. आज भारताला जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये एक ‘ब्राइट स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. भारताकडे आता जगातील सर्वात मोठ्या आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजना आहेत. शेतकरी नवकल्पनांद्वारे देशाला आत्मनिर्भर बनवत आहेत. ‘गर्व से कहो, ये स्वदेशी है’ ही भावना आज प्रत्येक क्षेत्रात दिसते आहे. भारताच्या जनतेचा विश्वास आणि स्नेह हे माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. संविधानाच्या मूल्यांना मार्गदर्शक मानून मी विकसित भारताच्या स्वप्नासाठी अधिक जोमाने काम करत राहीन,” अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.

Narendra Modi emotional post, reveals the journey of two penances since becoming Chief Minister

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023