विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरक्षण हे राजकारण नाही, जरांगे हे ‘ठिगळ’ लावत आहेत. सगळ्या पक्षातले मराठे नेते एकत्र येताना दिसत आहेत, पण कायदा ‘डाइल्यूट’ करता येत नाही. छगन भुजबळ जे करत आहेत ते अत्यंत योग्य आहे, काळाची गरज आहे, असे मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक् केले.
राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी लागू केलेल्या कुणबी-मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत संबंधित ‘जीआर’ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, ओबीसी नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली, तसेच या प्रकरणावर आपली कायदेशीर भूमिका स्पष्ट केली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना सदावर्ते म्हणाले, उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी स्थगिती दिलेली नाही, असे नाही. एक ‘दर्शनिक कारण’ दाखवावे लागेल, तेव्हा स्थगिती दिली जाईल. त्यांनी कोर्टाला विनंती केली की, एक ‘लेजिस्लेचर चॅलेंज’ सुरू आहे आणि दुसऱ्या शासन निर्णयामुळे दुसरे प्रकरण आले आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकरण एकाच न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात यावेत.
यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आरक्षण हे राजकारण नाही, जरांगे हे ‘ठिगळ’ लावत आहेत. राजकारणात वेगवेगळे फॅक्टर काम करतात. मराठेतर जे मुख्यमंत्री असतात, तेव्हा शरद पवारांसारखे लोक फाटले की ठिगळ लावण्याचे काम करतात.
दिल्लीत सरन्यायाधीशांवरील रोष व्यक्त करताना झालेले वर्तन चुकीचे होते. घोषणाबाजी करणे हे भावनिक होते. व्यक्त होणे मानवी स्वभाव आहे, पण व्यक्त होताना काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार-खासदार नाहीत, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील.
Jarange Is Only Patching Up, What Chhagan Bhujbal Is Doing Is Absolutely Right: Says Gunratna Sadavarte
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ