आय लव्ह पिग पोस्टरमुळे इंदूरमध्ये नवा वाद पेटला

आय लव्ह पिग पोस्टरमुळे इंदूरमध्ये नवा वाद पेटला

Indore

विशेष प्रतिनिधी

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात आय लव्ह पिगअसे लिहिलेले पोस्टर प्रमुख कलेक्टर ऑफिस चौकात लावण्यात आल्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आय लव्ह माेहम्मद या वादामुळे धार्मिक वातावरण ढवळून निघाले असतानाच पुन्हा एकदा अशी भडकाऊ पोस्टर्स दिसल्याने मुस्लिम समाजाच्या भावना भडकल्या आहेत.

स्थानिक नागरिकांच्या लक्षात हे पोस्टर येताच मोठी गर्दी जमली. जमावाने घोषणाबाजी करत पोलिस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. “ही पोस्टर्स आमच्या धर्माचा अपमान करण्यासाठी लावली आहेत. प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल,” असे एका आंदोलकाने सांगितले.

पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व पोस्टर्स काढून टाकली. शहरातील संवेदनशील चौकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. “पोस्टर्स लावणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.



मुस्लिम समुदाय नेत्यांनी आरोप केला की काही ‘दुष्ट प्रवृत्तीचे घटक’ जाणीवपूर्वक धार्मिक तणाव पुन्हा भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच कानपूर व इंदूर येथे “I Love Mohammad” वादानंतर दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता डुकरासंदर्भातील पोस्टर्स आल्याने हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे, कारण इस्लाम धर्मात डुक्कर अपवित्र मानला जातो.

या प्रकरणाने लगेचच राजकीय वळण घेतले. भाजप आमदार उषा ठाकूर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडत सांगितले, संविधान प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार देते. कोणावर प्रेम व्यक्त करायचे हे पूर्णपणे वैयक्तिक आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र टीका केली. “ही प्रकरणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नसून, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहेत,” असे काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले.

विश्व हिंदू परिषदचे नेते संतोष शर्मा यांनी मात्र हा विषय गौण असल्याचे म्हटले. “कोणाला कोणत्याही प्राण्यावर प्रेम व्यक्त करायचे असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. ही वैयक्तिक निवड आहे,” असे त्यांनी सांगितले.

एप्रिल 2025 मध्येही इंदूरमध्ये अशीच घटना घडली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शहरातील प्रसिद्ध ‘56 दुकान’ परिसरात “Pigs and Pakistani citizens not allowed” असे पोस्टर्स दिसले होते. त्या पोस्टर्सवर पाकिस्तानच्या सैनप्रमुखाचा फोटो आणि डुकराचे चित्र होते. त्या घटनेमुळेही संताप उसळला होता, परंतु कोणतीही मोठी कायदेशीर कारवाई झाली नव्हती.

पोलिस प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. “कोणत्याही अफवा पसरवू नयेत. शहरात शांतता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. इंदूरमध्ये शांतता बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

I Love Pig poster sparks new controversy in Indore

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023