विशेष प्रतिनिधी
धाराशिव : Omrae Nimbalkar शेतकऱ्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर शेतकरी आत्महत्या प्रकरणी तुम्ही सरकारवर गुन्हे दाखल करणार का? असा सवाल तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. भूम शहरात मदतीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला.Omrae Nimbalkar
भूम शहरातील गोलाई चौकात तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रस्तारोको आंदोलन करत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली होती. दरम्यान, जमावबंदीच्या सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले.Omrae Nimbalkar
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार २६ सप्टेंबर २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, शेतकरी भास्कर महादेव वारे ( रा. चिंचोली) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दि. ६) अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विठ्ठल राजाभाऊ बाराते, अरुण गाढवे, विलास पवार, संदीपन कोकाटे, अनिल भोरे, बिभीषण भैरट, भागवत साळुंकें, बप्पासाहेब गिलबिले, गणेश आंधरे, रंजीत पाटील, संजय गाढवे, विजयसिंह थोरात, अनिल शेडगे, रूपेश शेडगे, तानाजी पाटील, भगवान बांगर, शाहाजी शिंदे, विलास शाळू, दत्ता गाडवे, मनोज सुरवसे, प्रताप पाटील, अरविंद हिवरे यांच्यासह इतर ८०-९० शेतकरी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान मोठमोठ्याने घोषणाबाजी केली, हलगी वाजवली प्रबोधनात्मक भाषणे केली. दरम्यान, या आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), २२३, १८९(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या न्याय मागणी बाबत आंदोलन करताना आम्ही सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान केले नाही. तरीही गुन्हे दाखल होणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया आंदोलक शेतकरी भास्कर वारे यांनी दिली आहे.
MP Omrae Nimbalkar’s anger for filing crimes against farmers
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा