विशेष प्रतिनिधी
मुंबई : मधल्या काळात ज्या लोकांची सत्ता आली. त्यांनी याचे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली मात्र देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले,असा आराेप पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यावेळी मेट्राे मेट्रो लाईनला झालेल्या विलंबाबाबत पंतप्रधानांनी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, आज मेट्रोलाईनचे लोकार्पण झाले आहे. मात्र, या वेळी मला काही लोकांची आठवण होते. या मेट्रो लाईनचे भूमिपूजन देखील मी केले होते. त्यामुळे मुंबईकरांना आशा वाटत होती की, त्यांचे जीवन सुकर होईल. मधल्या काळात ज्या लोकांची सत्ता आली. त्यांनी याचे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली मात्र देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता मेट्रो लाईन पूर्ण झाल्यामुळे ज्या प्रवसाला दोन अडीच तासांचा वेळ लागत होता, तो 30 मिनिटांचा झाला आहे. एक -एक मिनिटांचे महत्त्व असलेल्या मुंबईला दोन-तीन वर्षापर्यंत या सुविधा पासून वंचित राहील राहावे लागले. हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही.
गेल्या अकरा वर्षापासून देशवासीयांचे जीवन सुविधाजनक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच रेल्वे, रस्ते मार्ग, विमानतळ, मेट्रो, इलेक्ट्रिक बस अशा प्रत्येक सुविधांवर अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रकल्प तयार झाले आहेत. वाहतुकीच्या प्रत्येक मार्गाला आपआपसात जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांना देखील नवीन टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रातील युवकांना यासाठी मी अनेक शुभेच्छा देत आहे. या प्रसंगी मला महाराष्ट्राचे सुपुत्र दि. बा. पाटील यांची देखील आठवण येत आहे. त्यांनी समाजासाठी शेतकऱ्यांसाठी सेवा भावाने काम केले. ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे जीवन हे आपल्या समाजाला कायमच प्रेरणादायी राहील. आज पूर्ण देश विकसित भारताच्या संकल्पाला जोडला गेलेला आहे. विकसित भारतात गती पण असेल आणि प्रगती देखील असेल. ज्या ठिकाणी लोकांचे हित हे सर्वात वर असेल. सरकारची योजना देशवाशीयांचे आयुष्य सुलभ बनवण्यासाठी असेल. मागील अकरा वर्षाच्या यात्रेमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात याच भावनेने तेज गतीने विकास झाला आणि काम झालेआहे.
गेल्या अकरा वर्षापासून देशवासीयांचे जीवन सुविधाजनक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच रेल्वे, रस्ते मार्ग, विमानतळ, मेट्रो, इलेक्ट्रिक बस अशा प्रत्येक सुविधांवर अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रकल्प तयार झाले आहेत. वाहतुकीच्या प्रत्येक मार्गाला आपआपसात जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे. ते मुंबई मेट्रो लाईन 3 च्या फेज 2बी चे उद्घाटन देखील त्यांनी केले. ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. नवी मुंबई विमानतळावरील टर्मिनल कमळाच्या आकाराच्या डिझाइनमध्ये विकसित करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये येथून नियमित उड्डाणे सुरू होतील. हे मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
Mahavikas Aghadi stopping the work, Prime Minister Modi attacks
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा