विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणारे अधिवक्ता राकेश किशोर यांनी एका माध्यम संस्थेशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या कृतीला काही डाव्या व तथाकथित उदारमतवादी गटांनी ‘दलितविरोधी’ ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र किशोर यांनी या आरोपांना फेटाळून लावत सांगितले की, ते स्वतः दलित आहेत आणि बुद्धांच्या शिकवणीने प्रभावित आहेत.
बरेली (उत्तर प्रदेश) येथील मूळचे असलेले आणि सध्या दिल्लीतील मयूर विहार एक्स्टेंशनमध्ये राहणारे अधिवक्ता किशोर म्हणाले, “लोक मला ओळखत नाहीत, पण मी स्वतः दलित आहे. माझे नाव राकेश किशोर आहे, पांडे, तिवारी, गुप्ता किंवा जेसवाल नाही. मी माझा जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे दाखवायला तयार आहे.”
ते पुढे म्हणाले, “मला दु:ख होते की काही लोक स्वतःला हिंदूंपासून वेगळे करत आहेत. काल काही लोक माझ्या घरासमोर जमले आणि धमकावले. मी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला आहे आणि गौतम बुद्धांनी कधीही हिंदू धर्माची निंदा केली नाही हे मला ठाऊक आहे.”
किशोर यांनी पुढे सांगितले, “बौद्ध धर्म आमचाच आहे, तो आपल्या संस्कृतीच्या विशाल वृक्षातून निर्माण झाला आहे. मी भगवान बुद्धांचा प्रचंड आदर करतो, त्यांचे वाचन करतो आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करतो.”
मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांनी भगवान विष्णूंविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना किशोर म्हणाले, “त्यांच्या मनात जे हिंदू धर्म आणि सनातन धर्माबद्दल असंतोष आणि राग होता तोच बाहेर आला. त्यांच्या अंतर्मनातील भावना त्या वक्तव्यातून व्यक्त झाल्या.”
किशोर यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या “जातीय हेतू”च्या आरोपांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या कृतीमागे कोणताही जातीय वा राजकीय हेतू नसून ती धार्मिक भावनांमधून उद्भवलेली प्रतिक्रिया होती.
tatement of advocate Rakesh Kishor who threw slippers at the Chief Justice
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा