विशेष प्रतिनिधी
कोलकाता : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अहवालाने पश्चिम बंगालमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण देशातील सर्वाधिक असल्याचे उघड केले आहे.बलात्कार, अत्याचार, लैंगिक छळ, आणि घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये राज्याची आकडेवारी मागील दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे.
राज्यात गुन्ह्यांच्या आकडेवारीवर पांघरूण घालणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे महिलांविरोधातील गुन्ह्यांवरील वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. नुकत्याच झालेल्या दुर्गापूरमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर बॅनर्जी यांनी “मुलींनी रात्री बाहेर पडू नये” असे वक्तव्य करून संताप ओढवून घेतला आहे.
दुर्गापूर येथे ओडिशातील दुसऱ्या वर्षातील MBBS विद्यार्थिनीवर १० ऑक्टोबर रोजी रात्री अपु बावरी, फिरदोस शेख, शेख रियाजुद्दीन आणि इतर दोघांनी जंगलात ओढून नेऊन सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितले, “आमचा विश्वास संपला आहे. माझी मुलगी आता बंगालमध्ये राहणार नाही. ती पुढील शिक्षण ओडिशातच घेईल.”
ही भीती आणि अविश्वास अनाठायी नाही. काही महिन्यांपूर्वीच कोलकात्यातील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थीनी आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी घटनेवर प्रतिक्रिया देताना “कडक कारवाई होईल” असे सांगितले असले तरी, त्यांनी पीडितेलाच जबाबदार धरल्यासारखे वक्तव्य केले. “मुली रात्री १२.३० वाजता बाहेर कशा गेल्या? कॉलेजने त्यांना बाहेर जाण्याची परवानगी द्यायला नको होती. मुलींनी स्वतःची जबाबदारी घ्यावी लागेल, स्वतःला जपावं लागेल,” असं त्यांनी म्हटलं.
त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक आणि महिला संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील मुख्यमंत्री स्वतः महिला असूनही, त्या पीडितांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांच्याच वर्तनावर प्रश्न उपस्थित करत आहेत, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे,” असे विरोधकांनी म्हटले.
राज्यात महिला मुख्यमंत्री असूनही, महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे. सामाजिक संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की, “महिलांच्या सुरक्षेवर बोलण्याऐवजी कृती दाखवा.”
NCRB report reveals the grim reality of violence against women in Bengal
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा