विशेष प्रतिनिधी
मुंबई : पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, हे अत्यंत चुकीच आहे. जातीय सलोखा ठेवा, स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातिवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा, आपण करत असलेल्या विधानामुळ जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे. यावेळी धर्मनिरपेक्षता जपण्याच आवाहनही शरद पवारांनी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
शरद पवार म्हणाले, राजकारणात जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा ते जास्त महत्वाच आहे. वाचाळवीर वाढले आहेत, दुर्दैव आहे कोणी कोणाकडून काय खरेदी करावे यावर सरकार गप्प बसते? सरकारचा त्याला पाठिंबा आहे का? दरी निर्माण केली जात आहे.
राजकारणात तरुणांना संधी देण्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येतील यासाठी प्रयत्न करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती बैठकीत देण्यात आली. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत निर्णय करा, अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे, काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. आज अल्पसंख्यांक समाजाचा निर्णय घेतला असेच युवक आण युवतींचा निर्णय होणार आहे.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे, ती तुटपुंजी आहे. केंद्रीय पथकान येऊन पाहणी केली पाहिजे होती. आमच्या वेळेस केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरघोस मदत देत होते. नरसिंह राव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते राज्यात अतिवृष्टीच्या पाहण्यासाठी येणार होते. पण, तेव्हा मीच त्यांना पाहण्यासाठी येऊ नका असे म्हटले. कारण, शासकीय यंत्रणा तुमच्या दौऱ्यासाठी लागेल असे सांगितले.
Don’t use casteist language, use the language of love when speaking: Sharad Pawar’s appeal
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा