विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rajdeep Sardesai ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक माफी मागितली आहे. यावेळी ती २०११ साली IBN7 वाहिनीवर Cobrapost यांच्या सहकार्याने प्रसारित झालेल्या “दिल्लीज डबल एजंट्स” या कार्यक्रमातील खोट्या आरोपांबाबत आहे. या कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक अजीतसिंग तोकस यांनी अनधिकृत बांधकामांशी संबंधित व्यवहारासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे आता सरदेसाई यांनी कबूल केले आहे.Rajdeep Sardesai
१३ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून तोकस यांची सार्वजनिक माफी मागितली. त्यानंतर एक्स (माजी ट्विटर) वरही त्यांनी एक माफीनामा प्रसिद्ध केला. या माफीनाम्यात त्यांनी स्पष्ट लिहिले की, “या आरोपांबाबत कोणतेही पुरावे नव्हते. उलट तोकस यांनी अनेक वेळा लाच स्वीकारण्यास नकार दिला होता. या खोट्या बातमीमुळे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेला धक्का बसला, याबद्दल मी दिलगीर आहे.”Rajdeep Sardesai
सरदेसाई यांनी या प्रकरणाची जबाबदारी एका “बाह्य एजन्सीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर आधारित” असल्याचे सांगत स्वतःवरील जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, या घटनेने पुन्हा एकदा सरदेसाईंच्या पत्रकारितेतील “एकतर्फी आणि राजकीय पक्षपाती वागणुकीचे पॅटर्न” अधोरेखित केले आहे.
ही माफी राजदीप सरदेसाईंच्या वादग्रस्त कारकिर्दीतील एकमेव घटना नाही. मागील दोन दशकांत त्यांनी अनेकदा चुकीच्या बातम्या, भ्रामक रिपोर्टिंग आणि नंतर मागे घेतलेल्या आरोपांमुळे मथळे गाजवले आहेत — आणि या सर्वच प्रकरणांमध्ये भाजप आणि त्यांचे नेते हेच त्यांच्या रिपोर्टिंगचे लक्ष्य राहिले आहेत.
याहून गंभीर म्हणजे, राजदीप सरदेसाई यांच्यावर २००८ च्या “कॅश फॉर वोट स्कॅम” च्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज मुद्दाम दडपल्याचा आरोप देखील आहे.
या प्रकरणाचे धक्कादायक तपशील काही महिन्यांपूर्वी पत्रकार मनोज रंजन त्रिपाठी यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये उघड केले.
त्रिपाठी यांनी सांगितले की, “कॅश फॉर वोट स्कॅम संसदेत येण्याआधीच आम्ही स्टिंग केले होते. त्या सीडीमध्ये मोठ्या नेत्यांची नावे होती. पण राजदीप सरदेसाई यांनी ती प्रसारित होऊ दिली नाही. तेव्हा ते माझे बॉस होते. जर ती सीडी दाखवली गेली असती, तर अनेक दिग्गज नेते उघडे पडले असते.”
त्यांनी पुढे म्हटले, “मी हे बोलतो आहे कारण हे सत्य आहे. मी स्वतः शंभरहून अधिक पत्रकारांना ओळखतो, ज्यांना हे माहीत आहे की ती सीडी दडपण्यात आली होती.”
य सोशल मीडियावर जनतेचा संताप उसळला असून, अनेकांनी सरदेसाईंकडून उत्तराची मागणी केली आहे. याआधीही दूरदर्शनचे माजी अँकर अशोक श्रीवास्तव यांनीही राजदीप सरदेसाई यांनी UPA सरकारच्या काळात “कॅश फॉर वोट” स्टिंग लपवले होते असा आरोप केला होता.
Journalist Rajdeep Sardesai apologizes again for 2011 fake news;
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा