विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना यंदाची दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जाहीर केला.
एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाच अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांच प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाच अतिरिक्त मुख्य सचिव संजय होळकर, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.
एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीन े मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यासह वाढीव थकबाकीचा हफ्ता देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे संयुक्त कृती समितीन धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे कृती समितीन रात्री उशिरा कळवले आहे.
Diwali gift of Rs 6,000 to ST employees, dharna protest temporarily suspended
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा