विशेष प्रतिनिधी
मुंबई : मतचोरी, सदोष मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर असलेले आक्षेप मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार आहेत. Raj and Uddhav Thackeray
काल मंगळवारी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली होती. यावेळी या सर्व नेत्यांनी मतदार यादीतील विसंगतींवर अनेक प्रश्न विचारले होते. मात्र आयोगाने या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी वेळ हवा असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे ही चर्चा अपूर्ण राहिली. या पार्श्वभूमीवर, आज सकाळी ११ वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे संयुक्तपणे सर्वपक्षीय नेत्यांशी बैठक घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करणार आहेत.
आज निवडणूक आयोगासोबत चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि राज ठाकरे प्रथमच संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे. शिवालय या ठिकाणी ही संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे हे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र दिसणार आहेत. एकाच मुद्द्यावर एकत्र आलेल्या या नेत्यांची आजच्या बैठकीनंतरची पुढची भूमिका काय असेल, याबाबत राजकारणात मोठी उत्सुकता आहे.
मंगळवारच्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र आजच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. ते पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला रवाना झाले आहेत. त्यामुळे आज शरद पवारांशिवाय सर्व नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मतदार याद्यांच्या वादातून सुरू झालेल्या राजकीय संघर्षावर या बैठकीत काहीतरी ठोस तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील मतचाेरीच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कल निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनातूनही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न केवळ राजकीय पक्षांचे नसून सर्वसामान्यांच्या मनातही हेच प्रश्न असल्याचे म्हटले होते.
2024 मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळलीदेखील गेली. पण जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगाने जी नावं वगळली आहेत, त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावे ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत.
कारण तो प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे.राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसालासुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही आहे. ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट सांगावं आणि जर यादी प्रसिद्ध करायचीच नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा? असा सवाल केला होता.
Raj and Uddhav Thackeray will meet the Election Commission again today
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा