विशेष प्रतिनिधी
मुंबई : मतदारयाद्यांमध्ये घोळ घातला असून लोकशाहीचा खेळखंडोबा सुरु आहे. लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही गाजवू देणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. Uddhav Thackeray
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली. काल झालेल्या बैठकीत निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुधवारीदेखील शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, “लोकशाहीसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. हा विषय गेल्या विधानसभेपासून सर्वांच्या लक्षात येत आहे. आज आम्हाला त्यांच्याशी बोलताना हे लक्षात आले की, ते निवडणूक अधिकारी नव्हेत तर कठपुतळी बाहुल्या आहेत. त्यांना वरून कोणातरी आदेश देते आणि हे काम करतात. त्यामुळे आम्हाला आमच्या मुद्द्यांवर योग्य उत्तर मिळाली नाहीत. मतदार यांद्यामध्ये घोळ होता कामा नये, सत्ताधाऱ्यांच्या चोरवाटा आम्ही रोखल्या आहेत.
“सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांची केस सुमोटो घेतली होती. तशीच मनुष्य प्राण्यांची ही केस घेतली पाहिजे. लोकशाहीच्या नावाने आयोग हुकूमशाही गाजवत असेल तर गाजवू देणार नाही. दोन्ही आयुक्तांना भेटलो. केंद्राच्या प्रतिनिधींनी सांगितले, हा विषय राज्य निवडणूक आयोगाकडे येतो. राज्य आयुक्त म्हणतात मतदार याद्यांचा विषय केंद्राकडे येतो. मग याचा बाप कोण. काल त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आम्ही त्याला विरोध केला. दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणूक नको, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवला.” अशी माहिती देत उद्धव ठाकरेंनी दिली.
“आम्ही एकत्र येताना भाजपलाही पत्र दिले होते. तरीही आज आमच्यासोबत आयोगाकडे भाजप नेते आले नाहीत. भाजपचे काही कार्यकर्ते मतदार याद्यांशी खेळत असल्याची तक्रार आहे. आम्ही निवडणुकीच्या एका महिन्याआधीच पत्राद्वारे ही केली होती.” असे तसेच, मतदारयादीतील घोळ दूर होत नाही, तोवर निवडणुका घेऊ नका, अशी मागणीदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्याचे सांगितले आहे. अशामध्ये जसा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो, तसा सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? असा सवालदेखील त्यांनी यावेळी विचारला.
“Won’t Allow Democracy to Be Destroyed, Won’t Let Dictatorship Rule” — Uddhav Thackeray’s Warning
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा