विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार मधील जंगल राज्य प्रतीक बनलेला कुख्यात गुंड शहाबुद्दीन यांच कुटुंबाला राष्ट्रीय जनता दराने पुन्हा एकदा राजकीय बळ दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिवंगत नेते शहाबुद्दीन यांच्या मुलगा ओसामा शहाब याला रघुनाथपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या घोषणेमुळे सियवान जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. Osama Shahab
सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे विद्यमान राजद आमदार हरीशंकर यादव यांनी स्वतःची जागा रिकामी करत ओसामाच्या समर्थनार्थ माघार घेतली. यादव यांनी म्हटले की, “शहाबुद्दीन कुटुंबाने माझ्या राजकीय आयुष्यात मोठी मदत केली, म्हणून मी ही जागा निष्ठेने सोडत आहे.”
हरीशंकर यादव हे २०१५ साली पहिल्यांदा या मतदारसंघातून राजदचे आमदार म्हणून निवडून आले होते आणि २०२० मध्ये पुन्हा विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा हा निर्णय पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, महागठबंधन अजूनही जागावाटपावर एकमताने पोहोचलेले नाही. काँग्रेस, राजद, व्हीआयपी आणि सीपीआय-एमएल या पक्षांमध्ये जागावाटप आणि काही प्रमुख मतदारसंघांवरून मतभेद सुरू आहेत.
राजदने सीपीआय आणि सीपीआय-एमएलसोबत मिळून स्वतःच्या दावा नसलेल्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्यामध्ये तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे.
मो. शहाबुद्दीन हे सियवानचे प्रभावशाली नेते होते, ज्यांची ‘रॉबिनहुड प्रतिमा’ होती, मात्र त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. १९९६ मध्ये ते सियवान येथून खासदार म्हणून निवडून आले होते. नंतर शिक्षा झाल्यानंतर त्यांनी पत्नी हिना शहाब यांना राजकारणात उतरवले, मात्र त्या २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या.
२०२४ मध्ये हिना शहाब यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून सियवानमधून लढा दिला, परंतु त्या जेडीयूच्या विजयलक्ष्मी कुशवाहा यांच्याकडून ९३,००० मतांनी पराभूत झाल्या. राजदचा अधिकृत उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिला होता.
हरीशंकर यादव हे शहाबुद्दीन कुटुंबाचे जवळचे समर्थक असून, त्यांनी आजही त्यांच्याशी असलेली निष्ठा कायम ठेवली आहे.
या निर्णयामुळे सियवान जिल्ह्यातील निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता असून, शहाबुद्दीन घराण्याचा वारसा पुन्हा एकदा राजदच्या बालेकिल्ल्यात जंगल राजची तयारी म्हणून पाहिले जात आहे.
Bihar Braces for Return of ‘Jungle Raj’: Shahabuddin’s Son Osama Shahab Gets RJD Ticket
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा