विशेष प्रतिनिधी
पुणे : सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज (गुरुवार) किवळे येथे येणार आहेत. या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.समारंभाच्या अगोदरच मान्यवरांच्या मंचाखाली एक साप आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या परिसराची पाहणी करून सापाला सुरक्षितपणे पकडून बाहेर सोडले. या घटनेमुळे काही काळ विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या मुख्य मंचावर उपस्थित राहणार होते, त्याच मंचाखाली एक साप आढळून आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VVIP) मंचावर येण्यापूर्वी सापाचा शिरकाव झाल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली.
दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी किवळे परिसरात तात्पुरत्या वाहतूक वळणांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
मुळशी विवा सर्कलमार्गे बावधन आणि पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांना एनसीसी ऑफिस, भुजगाव, कोथरूड आणि ट्रू व्हॅल्यू अंडरपासमार्गे वळविण्यात येईल. तसेच, चांदणी चौक–सातारा लेन सर्विस रोडवरून विवा चौकमार्गे जाणाऱ्या वाहनांना कोथरूड किंवा डीआयवाय शो-रूममार्गे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांना आगाऊ नियोजन करून प्रवास करण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुरक्षा यंत्रणा, वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासन या सर्वांनी मिळून राजनाथ सिंह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
Snake enters Symbiosis University before Rajnath Singh’s arrival; Security issue on the agenda
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा