विशेष प्रतिनिधी
नागपूर : अतिवृष्टीने कंबरडे माेडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर साेडले आहे. शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे,त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. Vijay Vadettiwar
नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, घर पडली आहेत. २५३ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे, पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे. त्यात जास्तीची मदत नाही.ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडल्या आहेत त्यांना दिलेली मदत तीन वर्षात मिळणार आहे. तोपर्यंत शेतकरी कसा जगणार? त्यामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करावा.
कापूस खरेदीला अजूनही सीसीआय कडून परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी टाकलेल्या अटी जाचक आहेत,त्यामुळे कापूस खरेदी करताना हात आखडता घेतला जाणार आहे,यामुळे शेतकरी बरबाद होऊन जाईल. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक गेले आहे त्यात मिळणारा भाव इतका कमी आहे की शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा हा छळ करू नये अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यावरील विद्यमान व्यवस्थापन मंडळाऐवजी पणन मंत्र्यांच्या हातात कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्र जाणार आहे. यातून मंत्र्यांना मलिदा खाण्याची सोय करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कोट्यवधीची उलाढाल होते. त्यावर मंत्र्यांची वाईट नजर गेल्याने हा निर्णय झालेला आहे. निवडून आलेले प्रतिनिधी ,मंडळ बरखास्त करणे हा अन्याय आहे अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
Government fraud, farmers in Diwali blackout: Vijay Vadettiwar criticizes government
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा