विशेष प्रतिनिधी0
मुंबई :Uddhav Thackeray सरकारने जमिनीच्या दुरुस्तीसाठी जे साडेतीन लाख जाहीर केले आहेत, ते पैसे नंतर द्या, पण आधी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी एक लाख रुपये टाका आणि त्यांचे कर्ज पूर्ण माफ करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मला मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकरी आठवतो आहे.Uddhav Thackeray
राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे इतर कोणी येवो न येवो, त्यांच्यासोबत कोणी उभा राहो न राहो, पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावर आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी यापूर्वीही दिला आहे. परंतु सरकारकडून फसवा फसवी सुरू आहे. असे असले तरी मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शब्द दिला आहे की, जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत या सरकारला आपण सोडायचं नाही.
ठाकरे म्हणाले की, मी मुंबईत असलो तरी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी माझा वारंवार संपर्क सुरू असतो. मी दिवाळीनंतर तिथे येणार असलो, तरी तालुका पातळीवर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही हे पाहायला हवं. तसेच ती मदत मिळवून देण्याचे काम आपल्या शिवसैनिकांनी करायचं आहे. नाहीतर नुसत्या घोषणा देऊन काय उपयोग, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.
Deposit Rs 1 lakh in farmers’ accounts before Diwali and waive off loans completely, demands Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा