विशेष प्रतिनिधी
बीड : ओबीसींच्या मुळावर उठलेल्या कोणाही समाजाच्या नेत्याला आडवे करा. ओबीसी विरोधकांना डोक्यात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हिशोब करा, असे आवाहन ओबीसी समाजाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित ओबीसी महाएल्गार सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर आ. धनंजय मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. मनोज कायंदे, प्रा. मनोहर धोंडे, प्रा. लक्ष्मण हाके, लक्ष्मण गायकवाड, पंकज भुजबळ, शब्बीर अन्सारी आदी उपस्थित होते. Chhagan Bhujbal
भुजबळ म्हणाले की, मुंबईत सरकारने नरमाईने घेतले. जीआर निघाला. आम्ही कोर्टात गेलो, तेथे न्याय मिळण्याची खात्री आहे. आता आम्ही न्यायदेवतेकडे आणि रस्त्यावर दुहेरी लढाई लढणार आहोत.
ओबीसीसोबत असल्याचे सांगायचे अन् दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडीओ यावेळी दाखवला. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे भुजबळ यावेळी म्हणाले.
विखे पाटील यांच्यावर टीका करताना भुजबळ म्हणाले, विखे पाटलांनाही सोडणार नाही, उलटेसुलटे आदेश दिले. आम्ही कोर्टात, रस्त्यावर लढू. ओबीसी समाजाने मनात आणले तर नेत्यांना सतरंजी उचलायला लावतील. सकाळी अर्ज केला, त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळते. अधिकारी इतके फास्ट कसे झाले, अशी टिपणी करत भुजबळ म्हणाले, जिथे ८-१० महिने लागतात, तिथे दहा तासात प्रमाणपत्र कसे? असा प्रश्न भुजबळ यांनी केला.
विरोध करायचा म्हणून नाही आणि न्यायी आरक्षणाच्या विरोधातही नाही, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार मेळाव्यात उभा असल्याचे आ. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
https://youtu.be/NllNYPn0KcY
Those who targeted the OBCs will have to face the consequences in the elections, warns Chhagan Bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा