विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Farmer Loan Waiver Scheme राज्य शासनाने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या ‘ शेतकरी कर्जमाफी योजने’ची (Farmer Loan Waiver Scheme) रक्कम सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार ६ आठवड्यांत लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन सूर्यवंशी व न्या. वैशाली जाधव-पाटील यांनी वित्त व नियोजन विभागाला दिले आहेत.
पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबत शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर खंडपीठाने वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे ॲड. अजित काळे यांनी अवमान याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत ‘याचिकाकर्ता आणि शेतकऱ्यांची देय रक्कम ६ आठवड्यांत देऊ,’ इतर शेतकऱ्यांबाबत ८ आठवड्यांत निर्णय घेऊ, असे निवेदन सहायक सरकारी वकील के. एस. पाटील यांनी केले. Farmer Loan Waiver Scheme
http://youtube.com/post/UgkxBNJpolV187Jqj4lX6r3hSF37O-f7zIVe?si=f7un_Cd_YbXi6xAt
सहकार खात्याची मागणी योजनेचा लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सहकार खात्याने १ ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल केला आहे. निधी उपलब्ध होताच पात्र शेतकऱ्यांना तो वितरित केला जाईल, असे अवर सचिवांनी कळविले होते. त्याअनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. या निर्णयामुळे सुमारे ६ लाख शेतकऱ्यांना ५,८९५ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.
Court orders to pay the amount of ‘Farmer Loan Waiver Scheme’ to the beneficiary farmers within 6 weeks
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा