विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडला भाजपा स्वबळावर लढणार आहे. जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक तिथे वेगळे लढू. मुंबईत मात्र महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बाेलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजपा स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू. मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. मुंबईत एकत्र पण राज्यात वेगळे लढून निकालानंतर एकत्र येऊ .
मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणार आहोत असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडीचा कसा फायदा झाला, त्याचे पुरावे देणार आहे.
दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर फडणवीस म्हणालह, सध्या तरी मी वर्षावरच राहणार आहे. दिल्लीत जाण्याबाबत २०२९ नंतर बघू.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. ठाकरे बंधू एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील अशी चर्चा आहे. त्यामुळे कुठलीही रिस्क न घेता मुंबईत महायुती म्हणूनच लढण्याचा भाजपाचा विचार आहे. मुंबई महापालिकेवर युतीचा महापौर असेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांना कुठलाही फायदा होऊ नये यादृष्टीने महायुती रणनीती आखत आहे. त्यात मुंबईत एकत्र लढू पण इतर महापालिकांमध्ये ताकद पाहून वेगळे लढण्याची भूमिका घेऊ असं फडणवीस म्हणाले.
BJP’s slogan is to fight on its own in other major municipalities except Mumbai.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..