Ravindra Dhangekar : घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर कारवाईच्या खोट्या बातम्या, रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा

Ravindra Dhangekar : घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर कारवाईच्या खोट्या बातम्या, रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा

Ravindra Dhangekar t

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ravindra Dhangekar 2024 ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरतोय, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरयांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे.Ravindra Dhangekar

पुण्यातील जैन बोर्डिंग जागा गोखले बिल्डरला दिल्याच्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी आजपर्यंत कधीही भाजपच्या विरोधात बोललो नाही. मी विकृतींवर बोलत आहे. हा जमिनीचा जो कांड झाला आहे, या कांडमध्ये जे जे आहेत त्यांची नावे सारखी घ्यावी वाटत नाही.पण त्यांचे नाव सर्वांना माहिती आहे. मला देवेंद्र फडणवीस यांनी जर बोलवले तर मी त्यांच्याकडे जाऊन बाजू मांडेल. त्यांना खरे खोटं चांगले कळते. ते त्या गोष्टीमध्ये माहिर आहेत. पण ते माझ्याशी बोलतील असे मला वाटत नाही. मी माझी बाजू माध्यमांवर मांडतच आहे.Ravindra Dhangekar



 

मी भाजपविरोधात बोललो नाही तर विकृती-विरोधात बोललो आहे. यासाठी मला कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मी लढत राहणार. महावीरांचे देऊळ विद्यार्थ्यांचे हॉस्टेल होईपर्यंत मी लढत राहणार, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मला मानसन्मान देत शिवसेनेचा पदाधिकारी केले. प्रत्येक कार्यक्रमात माझा मानसन्मान केला. मी माझी बाजू मांडल्यानंतर ते कधीच माझी हकालपट्टी करणार नाही, मला नोटीस देणार नाही असे मला वाटते. शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे. अनेक संकटांना तोंड द्यायची माझी तयारी आहे असेही त्यांनी बोलताना म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व आहेत. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की जनतेच्या कामाच्या आड जर सत्ता येत असेल तर सत्ता बाजूला ठेवून तुम्हाला लढावे लागेल. त्यांच पद्धतीने मी काम करत आलो आहे मी शिवसेनेचा नगरसेवक होतो.

शिवसेना हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथ रावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.आणि पुन्हा एकदा सांगतो…..भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील, असे रवींद्र धंगेकरांनी म्हटले आहे.

“False reports of action against me spread to save himself from scam allegations: Ravindra Dhangekar targets Murlidhar Mohol”

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023