विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. काही पक्ष कल्याणकारी योजना जाहीर करत आहेत. मात्र, राष्ट्रीय जनता दल (RJD) समर्थकांनी प्रचाराचा वेगळाच मार्ग निवडला असून, त्यांनी बनवलेल्या भोजपुरी गाण्यांमधून गुंडाराज, हिंसा आणि यादव वर्चस्वाचे उघड प्रदर्शन केल्याने वाद निर्माण झाला आहे.
आरजेडी समर्थकांनी बनवलेल्या काही गाण्यांमध्ये गर्दी बंदुका, रायफल्स आणि लाठ्या दाखवत हिंसेचा गौरव करताना दिसते. गाण्यांचे बोल ‘यादव राज परतणार’, ‘विरोध करणाऱ्यांचे अपहरण करणार’ असे संकेत देतात. यामुळे 1990 च्या दशकातील लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीतील कुप्रसिद्ध ‘गुंडाराज’ परत येणार की काय अशी भीती मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर अशा गाण्यांच्या असंख्य रील्स आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. काही गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळाले असून, त्यातून हिंसेचा आणि जातीय वर्चस्वाचा स्पष्ट प्रचार होत आहे.
‘कोई बोलते रे, रबरी यादव जी के राज चली’ या गाण्यात रबरी यादव यांच्या राजवटीचा गौरव करण्यात आला आहे. दुसऱ्या एका गाण्यात तर उघड धमकी देण्यात आली आहे –
“भैया के आवे दा सत्ता में, कट्टा सटा के उठा लेबो घरा से रे”
(भैया सत्तेत आला की कट्टा दाखवून घरातून उचलून नेऊ).
हे गाणे ७ ऑक्टोबर रोजी यूट्यूबवर प्रसिद्ध झाले असून, दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, दीपक राज यादव यांनी गायलेले ‘RJD सरकार बंटो, भैया रंगदार बंटो’ या गाण्यात यादव जातीचे लोक सत्तेत येताच ‘रंगदार’ म्हणजेच माफिया डॉन बनतील, प्रत्येक घरात शस्त्र ठेवलं जाईल असा संदेश दिला आहे.
आरजेडीचे उमेदवार आणि भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव यांनी सुद्धा अशाच एका गाण्यात ‘यादव वर्चस्वा’चा प्रचार केला आहे. ‘मार देहब गोली… अहिरे के चली’ या गाण्यात ते स्वतः बंदूक आणि लाठीसह परफॉर्म करताना दिसतात. हे गाणे चार महिन्यांपूर्वी रिलीज झाले होते.
खेसारी यादव यांच्यावर यापूर्वीही अश्लील आणि वादग्रस्त गाणी तयार केल्याबद्दल टीका झाली होती. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर स्त्रियांविषयी अवमानकारक आणि समाजविरोधी गीतांच्या माध्यमातून विष पसरवल्याचा आरोप केला आहे. त्यावर खेसारी यांनी स्वतः काही गाणी चुकून बनली असल्याचे मान्य केले होते.
Lalu Prasad Yadav Supporters Threaten Return of ‘Gunda Raj’
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















