विशेष प्रतिनिधी
जालना : अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही असा आराेप करत शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. Manoj Jarange
अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली, तर नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेल्या 3 हजार कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी आंदाेलनाचा इशारा दिला आहे. Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अधिकारीच सरकारपेक्षा मोठे झाले आहेत. जे काम करत नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत ही तात्पुरता आनंद आहे, जसा देवेंद्र फडणवीस प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात. भाऊबीजेच्या दिवशी नुकसानीच्या याद्या तयार करत आहोत आणि लवकरच बैठक घेऊन राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांसाठी काम करणारे अभ्यासक, तज्ज्ञ आणि नेते यांना एकत्र बोलावून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.
सत्ताधारी आमदारांना विकास निधी म्हणून हजारो कोटींची खिरापत वाटली जात असल्याच्या मुद्द्यावर जरांगे म्हणालेल “आमदारांकडे हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आहेत, तरी त्यांना ५ कोटी देण्यात येत आहेत. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला आणि लाडक्या दाजीला न्याय दिल्याशिवाय शांत बसायचे नाही. शेतकऱ्यांसाठी हमीभाव, कर्जमुक्ती, कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करण्यासाठी हे ऐतिहासिक आंदोलन उभे करणार आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करताना जरांगे म्हणाले, “हा संधी साधू आहे. त्या विचारात वाढलेला वंश आहे ना त्यांच्याकडे, त्रास देणारा कसा होऊ शकतो वारस चालवणारा? त्यांचे हात रक्ताने भरलेले आहेत. त्यांनी हयातीत गोपीनाथ मुंडे यांना खूप त्रास दिला आहे. जो खरा वारस आहे तो हे विसरतो तरी कसा काय? जातीचा म्हणून किंवा तुमच्या घरातलं घर आहे म्हणून विसरताय त्रास दिलेला इतका, ही कुठली परंपरा आहे?
ओबीसींना म्हणायचे तुमच्या आरक्षणाला हात लागला नाही आणि इकडे आम्हाला जीआर द्यायचा, पण प्रमाणपत्र द्यायचे नाहीत. जर आमचा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही, तर तुमचा सुद्धा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या,” असा स्पष्ट इशारा देत, मराठा आरक्षणाच्या जीआरला धक्का लागल्यास आंदोलन कोणत्याही दिशेला जाऊ शकते, असे जरांगे यांनी सांगितले.
Manoj Jarange’s warning to launch a movement for farmers
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















