विशेष प्रतिनिधी
पुणे : Muralidhar Mohol विधानसभा, लोकसभा निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू आहे, असा हल्लाबाेल केंद्रीय राज्य मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर माेहाेळ यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर केला आहे.Muralidhar Mohol
पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील असंही त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याशी संबंधित व्यक्ती व संस्था यांना लाभ होईल अशा प्रकारे राज्याच्या मुख्य धर्मदाय आयुक्तांवर दबाव टाकत नियमबाह्यपणे पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी विकण्याची तातडीने परवानगी मिळवून दिली असल्याचा आरोपही धंगेकर यांनी केला आहे.Muralidhar Mohol
यावर प्रतिहल्ला करताना मोहोळ म्हणाले, एकच माणूस आहे, त्यावर बोलायचं मी सोडून दिल आहे. मी त्या दिवशी सगळे स्पष्टीकरण दिलं आहे. या शहरातलं वातावरण बिघडणारी जी मंडळी आहेत. त्यांचे वाईट नक्की घ्या पण त्यांच्याकडचे पुरावे आधी तपासा. पुरावे घ्या आणि त्यांच्या मुलाखती करा. उठायचं आणि काहीही आरोप करायचे असं चालत नाही. हे व्यक्तिगत सुरू आहे. विधानसभा लोकसभा निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू आहे. मी स्पष्टीकरण दिलं आहे पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असं मला वाटतं असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार आहे. पाच वर्षांपूर्वी मी तो व्हिडिओ बनवला होता. जुना व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करत आहे. तो कालचा व्हिडिओ नाही. या प्रकरणातील सत्यता तपासा. काल कुणीतरी एका दुकानाची ऍड करत होतं मग त्याच्यात ते पार्टनर झाले का? या शहराची राजकीय संस्कृती आहे. एक राजकीय माणूस ही राजकीय संस्कृती बिघडवत आहे.
This is being started by a frustrated man who lost the assembly and Lok Sabha elections: Muralidhar Mohol attacks Ravindra Dhangekar
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















