विशेष प्रतिनिधी
सातारा : साताऱ्यातील फलटण शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने स्वत:हून शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला.
महिला डॉक्टरने हातावर सूसाईट नोट लिहून आत्महत्या केली होती. त्या सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे होती. धक्कादायक बाब म्हणजे, मृत डॉक्टर महिलेने तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचे लिहिले होते.
प्रशांत बनकर याला शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली होती. तर पीएसआय बदने हा फरार होता. सातारा पोलिस पंढरपूरपासून ते पुण्यापर्यंत पीएसआय गोपाल बदनेचा शोध घेत होते. मात्र, शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बदने फलटण पोलिसांसमोर हजर झाला आहे. आता पोलिसांकडून पुढील कार्यवाही काय केली
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने तळहातावर सुसाइड नोट लिहून भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असे तिने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. या प्रकरणातील प्रशांत बनकरला आता पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आता गोपाल बदने हा देखील स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी चर्चा केली आणि महिला डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये नमूद केलेल्या पोलिसांवर तसेच इतर सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले. दोशी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक बदनेला निलंबित करण्यात आले आहे
Suspended PSI Gopal Badne, Wanted in Woman Doctor Suicide Case, Surrenders Before Polic
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी “शक्तिपीठ”चा अट्टाहास सोडावा, सतेज पाटील यांची मागणी, कृती समितीचा आंदोलनाचा इशारा
- आपल्याला हवा त्या पद्धतीने विषय संपविण्यासाठी भूमिका घेणार, जैन बोर्डिंग विक्रीवरून सुरू झालेल्या वादात मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
- Harshvardhan Sapkal : राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी: हर्षवर्धन सपकाळ
- Ajit Pawar : योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन



















