विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis nतरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल. अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.CM Fadnavis
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. तिच्या तळहातावर सुसाइड नोट आढळून आली. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे त्या सुसाइड नोटमध्ये लिहिले होते.CM Fadnavis
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे खूपच गंभीर प्रकरण आहे. कारण एक तरूण डॉक्टर स्वत:च्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते ही आमच्यासाठी एक दु:खद गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सरकारने कालच संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल.
या प्रकरणात विरोधक जे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेही खूप चुकीचे आहे. इतक्या संवेदनशील प्रकरणात, जेथे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहे, त्यातही राजकीय पोळी भाजण्याचे काम करणे ही असंवेदनशीलता आहे इतकेच मी म्हणेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“Politicizing a Sensitive Issue is Deeply Insensitive,” CM Fadnavis Slams Opposition Over Woman Doctor Suicide Case
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी “शक्तिपीठ”चा अट्टाहास सोडावा, सतेज पाटील यांची मागणी, कृती समितीचा आंदोलनाचा इशारा
- आपल्याला हवा त्या पद्धतीने विषय संपविण्यासाठी भूमिका घेणार, जैन बोर्डिंग विक्रीवरून सुरू झालेल्या वादात मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
- Harshvardhan Sapkal : राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी: हर्षवर्धन सपकाळ
- Ajit Pawar : योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन



















