CM Fadnavis : रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

CM Fadnavis : रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नाशिक : CM Fadnavis रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याच काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासोबतच महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.CM Fadnavis

अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली, महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजविण्याचे कामही केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले. या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालिन महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, संस्कृतीची माहिती मिळते. ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे. विविध आक्रमणे होऊनही महानुभाव विचार समाजात रुजूला. हा पंथ राज्य, देश आणि अफगाणपर्यंत विस्तारला आहे. या परंपरेने समतेचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची आहे.CM Fadnavis



 

भगवान चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजात प्रभू श्रीकृष्ण यांनी गीतेतून दिलेला विचार रुजविला, तोच संदेश समाजाला दिला. त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणले. समाजात भेदाभेद, विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभाव विचारातून एकसूत्रात बांधत त्यांना सन्मार्ग दाखविण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले. मुख्यमंत्री झाल्यावर महानुभाव पंथाच्या स्थळांचा विकास सुरू केला, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला, असे परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांनी सांगितले.

World-Class University to Rise at Riddhapur: CM Fadnavis Vows It’s on Global Map

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023