मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप

मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मुरलीधर मोहोळांनी आपले मित्र आणि बिल्डर विशाल गोखलेंसाठी पदाचा गैरवापर केल्याचे सांडलगत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा आरोप केला आहे.

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या निकटवर्तीय विशाल गोखले यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. धंगेकरांच्या पोस्टनुसार, मुंबईच्या जुहू विमानतळावर कार्यरत असलेल्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला जवळपास ₹२०० कोटींची थकबाकी होती. मात्र, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या “प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे” ही थकबाकी केवळ ₹२.३० कोटींमध्ये तडजोड करण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे.

धंगेकरांच्या मते, ही फक्त आर्थिक अनियमितता नाही, तर स्पष्टपणे “सत्तेचा गैरवापर करून केलेला आर्थिक सौदा” आहे. त्यांचा आरोप आहे की, ज्या बॉम्बे फ्लायिंग क्लबला मोहोळांनी फायदा करून दिला, त्याच क्लबने त्यांच्या व्यावसायिक भागीदार असलेल्या विशाल गोखले यांना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिले.

“पुण्यातील जैन बोर्डिंगच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी गोखले यांना लाभ मिळवून देण्याची ही पहिली वेळ नाही. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा वापर करून यापूर्वीही मोहोळांनी एका प्रकरणात मोठी अनियमितता केली. त्याच कंपनीने गोखले यांना विविध ठिकाणी प्रवासासाठी प्रायव्हेट जेट दिले,” असे धंगेकरांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.



धंगेकरांनी माहिती अधिकार कायदा (RTI) उत्तर आणि AAI च्या लेखापरीक्षण अहवालांचा हवाला देत म्हटले आहे की, नियमांनुसार व्यावसायिक दराने शुल्क आकारले गेले असते, तर सरकारला जवळपास ₹२०० कोटींचा महसूल मिळू शकला असता. मात्र, ती रक्कम ₹२.३० कोटींमध्ये तडजोड करून सुमारे ₹१९७ कोटींचे नुकसान केल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “मोहोळांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विशिष्ट व्यक्ती आणि संस्थांना लाभ मिळवून दिला. या व्यवहारामागे कोणत्या प्रकारच्या दलालीचा पैसा फिरला, याचा तपास आवश्यक आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे.”

केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करून खासगी क्लब आणि निकटवर्तीय बिल्डरला फायदा मिळवून देणे हा सरळसरळ भ्रष्टाचार आहे. हे प्रकरण फक्त आर्थिक नाही, तर नैतिकदृष्ट्याही गंभीर आहे,” असे धंगेकरांनी आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Ravindra Dhangekar Accuses Minister Murlidhar Mohol of Misusing Office for Builder Vishal Gokhale

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023