विशेष प्रतिनिधी
पुणे : जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुरलीधर माेहाेळ यांना डिवचले आहे.
‘मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला’, असं शीर्षक देऊन शेअर केलेल्या या पोस्टमधून सुषमा अंधारे (Sushma andhare) लिहितात की, ”मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला.सगळ्यात आधी विनोद तावडे, मग एकनाथ खडसे, मग पंकजा मुंडे, पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय. एकनाथ शिंदेंचा इस्तु इझलाय. गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय. अब…अब तेरा क्या होगा मुरली ?”, असा प्रश्न विचारत सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं आहे.
http://youtube.com/post/UgkxK9N9VgMZs_sttZGeKbgsUKvpF3_XY8_6?si=yeAU_T0R7YTnvl4p
शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी बाेलताना मुरलीधर माेहाेळ यांनी स्वत:हून आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे पसरविले हाेते. यासाठी साेशल मीडियाचा वापर केला हाेता. त्याच्या मागे काेण आहे, काेणाच्या मार्फत हे घडवून आणले याचा गाैप्यस्फाेट करणार असल्याचे त्यांनी म्हटले हाेते. मात्र, रविवारी शिवसेना गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दाैरा हाेता. यावेळी शिंदे आणि धंगेकर यांच्यात चर्चा झाली. त्यावेळीच शिंदे यांनी हा विषय आता संपल्याचे म्हटले हाेते. धंगेकर यांनीही आपण भाजपच्या विराेधात नसल्याचे सांगितले आहे.
“Those Who Obstruct the Chief Minister’s Path Are Destroyed” — Sushma Andhare Taunts Murlidhar Mohol
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















