Jain monks on hunger strike : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विराेधात जैन मुनींचे ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण

Jain monks on hunger strike : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विराेधात जैन मुनींचे ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विराेधात जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली येत्या ३ नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जैन समाजाने घेतला आहे. मुनी निलेश चंद्र विजय यांनी १ नोव्हेंबर रोजीच उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे त्यांना तारीख पुढे ढकलावी लागली आहे.


CM Fadnavis : रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

१ नोव्हेंबर हा सुट्टीचा दिवस असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते. याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी यांनीही मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चाची हाक दिली आहे. एकाच दिवशी दोन मोठ्या राजकीय पक्षांचे मोर्चे आणि जैन समाजाचे आंदोलन यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जैन मुनींच्या आंदोलनाला परवानगी नाकारली हाेती. त्यामुळे जैन मुनींनी तीन नाेव्हेंबरपासून उपाेषण करण्याचे ठरविले आहे,
कबुतरांना दाणे टाकणे ही जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वाशी जोडलेली आणि धार्मिक श्रद्धेचा भाग असलेली परंपरा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद झाल्याने अनेक कबुतरे दगावली असल्याचा दावा जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी केला आहे.मुंबईतील जैन मंदिरांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची मागणी केली आहे. जैन प्रार्थनास्थळे, कबुतरखाने आणि गोरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची त्यांनी मागणी आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे जैन समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. मुनी निलेश चंद्र विजय यांनी यापूर्वी “गरज पडल्यास शस्त्रे उचलू” असा इशारा दिला होता. मात्र, आता त्यांनी शांततामय मार्गाने ‘आमरण उपोषणा’चे अस्त्र हाती घेतले आहे. १ नोव्हेंबरची परवानगी नाकारल्यानंतर आता ३ नोव्हेंबरपासून हे आंदोलन सुरू करण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.

Jain monks on hunger strike to death from November 3 against the decision to ban pigeon houses in Mumbai

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023