विशेष प्रतिनिधी
साेलापूर : Ajit Pawar साेलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने सत्तेतील सहभागी असलेल्या अजित पवार गटालाच माेठा धक्का देण्याची तयारी केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील तीन बड्या नेत्यांना भाजपने गळाला लावले असून बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे नेत भाजपात प्रवेश करणार आहेत. काॅंग्रेसमधील एक बडा नेताही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.Ajit Pawar
त्या बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसमधील चार बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांचा ३० हजार मतांच्या फरकाने मोठा पराभव केला होता. या पराभवानंतर रणजित शिंदे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून माढा मतदारसंघात नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते माढा मतदारसंघातील आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत भाजपमध्ये दाखल होत आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी रणजित शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली हाेती.
माेहाेळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणेही बदलणार आहेत. माेहाेळ मतदारसंघातील माेठी ताकद असलेले राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माेहाेळ मतदारसंघ हा आरक्षित आहे. राजन पाटील साेबत असतील ताे उमेदवार निवडून येताे असा आजवरचा येथील इतिहास हाेता. राजन पाटील आणि यशवंत माने तसेच सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. राजन पाटील आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे साेलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यातील वादातून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
Ajit Pawar group against BJP in Solapur district, big leaders will join BJP
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















