विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालायची शक्यताय. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताजा अंदाजानुसार चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना 29 ऑक्टोबर रोजी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी या दिवशी विजांच्या गडगडाटासह खूप जोरदार पाऊस बरसण्याची शक्यताय. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याचा अंदाज वर्तवलाय. Maharashtra Rain
मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, लातूर, धाराशिवसह इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. या काळात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यताय. या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटणार असून त्याचा वेगळ ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
27 ऑक्टोबर, सोमवार
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यताय.
28 ऑक्टोबर, मंगळवार
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यताय.
29 ऑक्टोबर, बुधवार
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यताय.
30 ऑक्टोबर, गुरुवार
पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यताय.
ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना 29 ऑक्टोबर रोजी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी या दिवशी विजांच्या गडगडाटासह खूप जोरदार पाऊस बरसण्याची शक्यताय. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याचा अंदाज वर्तवलाय.
Maharashtra Rain Forecast IMD Issues Orange Alert For Vidarbha
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















