विशेष प्रतिनिधी
बीड : Prakash Solanke निवडणुकीच्या शेवटच्या दाेन दिवसांत काय घडते हे उघड सत्य आहे. दारूपासून ते पैशापर्यंत आणि वस्तूरुपाने काही काही द्यावे लागते. निवडणुकीतील हे सिक्रेट माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रकाश साेळंके यांनी उघड केले आहे. एव्हढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याकडे काय दारूगोळा उपलब्ध आहे, याची माहिती सुद्धा आम्हाला द्यावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.Prakash Solanke
माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ता बैठक झाली. या बैठकीत बोलताना प्रकाश सोळंके त्यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोळंके म्हणाले, “माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसे मतदान घेतले हे त्यांना चांगले माहिती आहे. ते एक्सपर्ट झाले आहेत. शेवटच्या दोन दिवसात कुणाला चपटी द्यावी लागते. कुणाला कोंबडं कापावं लागतं आणि कुणासाठी बकरु कापावं लागतं. कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. पण, यात तुम्ही एक्सपोर्ट बनलेले आहात.Prakash Solanke
नुसती निवडणूक लढवण्याची इच्छा असून उपयोग नाही. माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवल्या आहेत. आपण घेतलेल्या अनुभवाचा वापर या निवडणुकीमध्ये करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याकडे काय दारूगोळा उपलब्ध आहे, याची माहिती सुद्धा आम्हाला द्यावी लागणार आहे. निवडणूक लढवण्याची नुसती इच्छा असून उपयोग नाही, तर बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात, असा सल्लाही आमदार प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
साेळंके म्हणाल्या, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाही. मात्र, कुठेही कमी पडता कामा नये. समोरचा माणूस निवडणुकीत जर १०० रुपये खर्च करणार असेल, तर आपलीही १०० रुपये खर्च करण्याची तयारी असावी. आजपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला आहात. विधानसभेपेक्षा चारपट अधिक वेगाने काम करावं लागणार आहे. चारपट अधिक कष्ट करावे लागतील.
Quarter for some, chicken-and-goat for others: Prakash Solanke reveals the election secret
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















