विशेष प्रतिनिधी
मुंबई : सत्तेसाठी किती चाटूगिरी करणार? मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे. यासाठी किती लाचारी करणार? असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईतील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. निवडणूक आयोगाविरोधातील सत्याचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सामान्य माणसाला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री पदासाठी किती चाटूगिरी करणार, असा थेट सवाल त्यांनी केला. राज ठाकरे म्हणाले.
महाराजांच्या गड-किल्ल्यांवरील नमो पर्यटन सेंटर सुरु केले जाणार आहेत. ते आम्ही फोडणार. . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकार काही पर्यटन केंद्र काढत आहे. हे केंद्र शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड या किल्ल्यांसह साल्हेर किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र सुरु करणार आहे. मी आताच सांगतो, किल्ल्यावर किंवा किल्ला परिसरात कुठे ही हे केंद्र सुरु करु दिले जाणार नाही. महाराष्ट्रातील गड किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. पर्यटन केंद्र उभे केले तर ते तत्काळ फोडून टाकणार. आमची सत्ता असो की नसो हे केंद्र उभं केलं की फोडून टाकणार..
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे या खात्याचे मंत्रीपद आहे. त्यांचे नाव घेत राज ठाकरे म्हणाले, “खाली काय चाटूगिरी सुरु आहे, हे वर पंतप्रधान मोदी यांनाही माहित नसणार. सत्ता डोक्यात गेल्यामुळे आपण वाटेल ते करु, हा विचार येतो. मला मुख्यमंत्री केले पाहिजे. मला जे समोर दिसेल ते मिळाले पाहिजे. यासाठी समोरच्याला खूश करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते दिले पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे.”
राज ठाकरे म्हणाले, सत्तेसाठी हे लोक काहीही करत आहेत. महाराजांच्या गड किल्ल्यांवर नमो केंद्र सुरु करणार. यांना मुंबई देखील याचसाठी पाहिजे. सर्व जागा अदानीला देऊन टाकल्या आहेत. मुंबईत अदानी बोट ठेवेल तिकडे हे जागा देत आहेत. हे सगळं येतं सत्तेतून, आणि सत्ता येते ईव्हीएममधून असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
Raj Thackeray targets Eknath Shinde from Namo Tourism Center on forts
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				 
													



















