विशेष प्रतिनिधी
शिरूर : पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्यांच्या हल्यांत सातवीत शिकणाऱ्या रोहन बाळु बोंबे ( वय १३ वर्षे ) मुलांचा मृत्यु झाल्यांची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली आहे . त्यामुळे संपतप्त झालेल्या जमावाने वन विभागाची गाडी जाळली. वनविभागांच्या बेस कॅम्पलाही आग लावण्यात आली . Pimparkhed
रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी पिंपरखेड शेतात बाळु बोंबे यांचे घर असुन घरांच्या आजुबाजुला मोठे ऊसाचे क्षेत्र आहे . या घराच्या बाहेर मोकळया जमीनीत मुलगा रोहन हा शौचास बसला असताना त्यांच्यावर बिबट्यांने झडप घालीत त्याला शेजारील ऊसात ओढत नेत मानेला चावा घेत ठार केले . मुलाचा आरडा ओरडा ऐकुन वडील व आईने बिबट्यांच्या दिशेने धाव घेत मुलाला त्यांच्या तावडीतून सोडवले. रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुरड्या रोहनला आई – वडीलांनी ऊसातून बाहेर काढले. मात्र बिबट्या त्यांच्यावरही डरकाळ्या फोडत होता . या घटनेमुळे परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी करीत तीव्र संताप व्यक्त केला. वन विभागाची गाडीची मोडतोड करून त्याला आग लावण्यात आली .
या घटनेमुळे बोंबे कुंटुबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . प्रत्येक दहा दहा दिवसांच्या अंतराने बिबटयांने तिघांचा बळी घेतला आहे .
रविवारी ( दि. 12आक्टोबर) रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात साडेपाच पाच वर्षांची शिवन्या शैलेश बोंबे चिमुरडीचा मृत्यू झाला होता.
ती आपल्या आजोबा अरुण देवराम बोंबे यांना शेजारील शेतात पिण्याचे पाणी देण्यासाठी जात होती .
या घटना स्थळापासून एक किमी अंतरावर जांबुत हद्दीत बुधवार दि २२ आक्टोबर रोजी भागुबाई रंगनाथ जाधव ( वय ७० ) या महिलेला ठार केले आहे .
या तिन्ही घटना दहा दिवसांच्या अंतराने घडल्या आहेत . परीससरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको करीत वनमंत्री येण्याची मागणी केली . तिन्ही घटनांच्या वेळी प्रशासनाकडुन आश्वासनाशिवाय कोणतीही ठोस कृती होत नसल्यामुळे ग्रामस्थ तिव्र संताप व्यक्त करीत असुन तीव्र रोष व्यक्त करीत आहेत . वनमंत्री आल्याशिवाय मृत रोहनची बॉडी शवविच्छेदनाला पाठविण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत पंचतळे येथे रास्ता रोको केला .
Boy dies in leopard attack in Pimparkhed, mob burns forest department vehicle
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















