विशेष प्रतिनिधी
मुंबई: निवडणूक आयोग भूताटकी आहे. एका-एका घरात 40-50 मतदार आहे. मतदारांना आवाहन आहे की, तुमच्या घरात तुमच्याशिवाय निवडणूक आयोगाने कोणाला घुसवले आहे का? हे तपासले पाहिजे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. Uddhav Thackeray
मातोश्री येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “मतदारांनी स्वतःच आता मतदार याद्या तपासून आपले नाव, पत्ता, वय आणि लिंग योग्य आहे का, आणि आपल्या घरात आपलेच नाव आहे की इतरांचेही नाव आपल्या पत्त्यावर टाकण्यात आले आहे, हे तपासले पाहिजे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विधानसभा 2024 साठीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. येत्या 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र आयोगाने सध्या मतदार नोंदणी बंद केली आहे. यामुळे दरम्यानच्या काळात वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही.
या जेन-झीला सरकार घाबरत आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, नवमतदारांनी आमच्यासोबत यावे आणि त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवावे. उद्धव ठाकरे यांनी तरुण-तरुणींना, नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जनरेशन-झेड अर्थात जेन-झी यांनी मतदार नोंदणीसाठी आग्रह धरला पाहिजे.
ठाकरे म्हणाले, शेतकरी कर्जमुक्तीबाबत कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मग आतापर्यंत डोक्यावर असलेल्या कर्जाचे हफ्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे? रब्बीच्या हंगामासाठी नवीन कर्ज कसं मिळणार? शेतकरी कर्जमुक्तीसाठी ३० जून हा कोणता मुहूर्त आहे असा सवालही त्यांनी केला.
Election Commission Real or a Ghost?” Uddhav Thackeray Slams EC
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
- चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
- पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
- शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा



















