Ashish Shelar : भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही, ठाकरे बंधु हिंदूविराेधीअसल्याचा आशिष शेलार यांचा आराेप

Ashish Shelar : भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही, ठाकरे बंधु हिंदूविराेधीअसल्याचा आशिष शेलार यांचा आराेप

Ashish Shelar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ashish Shelar  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का? भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही. उद्धव ठाकरेंची भूमिका ही भूमिपुत्रांच्या विरोधातील दिसून येत आहे. ठाकरे बंधू हिंदू विराेधात आहेत अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते व महायुती सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.Ashish Shelar

राज ठाकरे यांनी दुबार मतदारांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना शेलार म्हणाले, मविआकडून ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मविआमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात ते जितक्या मतांनी निवडून आले त्या पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत.Ashish Shelar



आशिष शेलार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात 5 हजार 532 दुबार मुस्लीम मतदार आहेत, पण आपल्या मतदारसंघात जी मत फायद्याची आहेत त्यावर विरोधकांकडून काही आक्षेप घेतला जात नाही. तिथे रोहित पवार 1 ते दीड हजार मतांनी निवडून आले. तर मुंब्रा मतदारसंघामध्ये 30 हजारांहून अधिक मुस्लीम दुबार मतदार आहेत. नाना पटोले यांच्या मतदारसंघात 400 हून अधिक मुस्लीम दुबार मतदार असून ते केवळ 208 मतांनी निवडून आले. जिथे आपला फायदा आहे त्या ठिकाणी दुबार मतदारांवर काही न बोलण्याची भूमिका मविआचे नेते घेत आहेत. वरुण सरदेसाई जिंकले 11,365 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत.

आशिष शेलार म्हणाले की,आम्हाला मतदारांमध्ये भेद करण्याची इच्छा नाही. पण जे मतदारांमध्ये भेद करत आहे त्यांना उघडे पाडण्याचे काम आम्ही करत आहोत. जे दिसतंय ते लोकांसमोर आले पाहिजे म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भूमिका पाहिली तर ते मतदार यंत्र, मतदान यादी, निवडणूक आयोग, निकाल याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे हा सर्व फेक नरेटिव्ह तयार केला जात आहे. जनता यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.

आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरेंनी जे मतदारसंघ सांगितले त्यामध्ये केवळ त्यांना भोईर, पाटील असेच आडनावे दिसून आली. राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये केवळ मराठी माणूसच दिसला का? दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का? उद्धव ठाकरेंची भूमिका ही भूमिपुत्रांच्या विरोधातील दिसून येत आहे. राज ठाकरे यांना भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही.

शेलार म्हणाले की, कर्जत-जामखेड, इस्लामपूर, मुंब्रा, साकोली, उत्तम जानकर यांचा मतदारसंघामध्ये नाव एकसारखे आणि नंबर वेगळे आहेत. काही ठिकाणी नाव सारखे आहेत तर नाव एकसारखे आणि मतदार यादीतील नंबर दुसरा आहे. काही ठिकाणी नाव सारखे आहे तर लिंग वेगळे आहे. काही ठिकाणी पत्ते वेगळे दिले आहेत. काही ठिकाणी नाव वेगळे आहेत. तर काही ठिकाणी वडीलांचे नाव नाही, नावात अदलाबदल करण्यात आली आहे, शेख, अन्सारी यांचे दुबार मतदार चालतात कारण ते सोयीचे आहे.

लोक सभेवेळी मविआकडून ‘व्होट-जिहाद’

आशिष शेलार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली गेली आणि हे पाप महाविकास आघाडीने केले. हा एक सुनियोजित ‘व्होट-जिहाद’ होता. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता. हिंदू दुबार मतदारांवरून आरोप करताना मविआ आणि राज ठाकरे यांच्याकडून मुस्लिक, अल्पसंख्याक मतदारांवर मौन बाळगले जात आहे.

लोकसभेत महा विकास आघाडीची मते 2 कोटी 50 लाख 15 हजार 819 इतकी होती. तर, लोकसभेत महायुतीला मिळालेली मते 2 कोटी 48 लाख 12 हजार 627 इतकी होती. हे अंतर होते, 2 लाख 3 हजार आणि 192 इतक्या मतांचे होते. आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण केले.यात केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 इतकी असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपकडून संपूर्ण 288 मतदारसंघांवरही काम सुरू आहे. 16 लाख 84 हजार 256 मतदार आहेत. ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या असल्याचे शेलार यांनी म्हटले. ही संख्या मोठी असू शकते असा दावाही शेलार यांनी केला.

Bhoir Patil was seen but Asma was not, Ashish Shelar alleges that Thackeray brothers are anti-Hindu

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023