विशेष प्रतिनिधी
फलटण : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे एका ‘मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून’ करण्यात आले आहेत. मला गोळी घातली तरी चालले असते, पण किती बदनामी करता? असा भावनिक सवाल करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भर सभेत अश्रू अनावर झाले. Sushma Andhare
डॉक्टर आत्महत्या प्रकरणात होत असलेल्या आरोपांना जाहीर सभेत उत्तर देताना त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना थेट आव्हान देताना रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही त्यासाठी तयार व्हावे, नाहीतर ते ‘निंबाळकर नाही’ असे जाहीर करावे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, माझ्या भगिनी सुषमा ताई या ठिकाणी आल्या होत्या त्यांनाही आपण निमंत्रण दिले होते. पण त्या आल्या नाहीत. फलटण येथे ज्या भगिनीचा जीव गेला, त्याचे कारण काय असेल. रणजित सिंह निंबाळकर इथे कोणाचे चारित्र्यावर बोलत नाही आणि कधी बोलणार पण नाही. Sushma Andhare
नाईक निंबाळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अंतर्मनाला माहित होते की मी चुकणार नाही. कुठल्या पोलिसच्या रिपोर्टची गरज नाही. आयुष्यात जेव्हा पण मी काम करतो तेव्हा मी कधीही चुकीची कामे केली नाही. दिगंबर आगवणे यांनी त्यांनी स्वराज पथसंस्थेतून त्यांना कर्ज दिले होते. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मी स्पष्ट केले होते की या आगवणेला आपण कधी जवळ करणार नाही. जो माणूस पैशांसाठी कॉम्प्रोमाइज झाला त्याच्यासोबत आम्ही सोबत जाणार नाही. नंतरच्या काळात जे आम्ही कर्ज दिले होते, त्याची वसूली साठी जेव्हा आमचे लोक गेले तेव्हा त्यांनी शिव्या देणे सुरू केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती की त्यांच्याकडे हत्यारे आहेत. त्यावर निंबाळकरांनी व्हिडिओ दाखवत स्पष्ट केले की माझ्याकडे जी काही हत्यारे आहेत ते बेकायदेशीर नाहीत. मला त्यांच्याबाबत काही बोलायचे नाही.
आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. तालुक्यातील 60 टक्के जनता आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही रिपोर्टची गरज नव्हती. मी त्यांना मातीसाठी भेटलो, काही वैयक्तिक मागितले नाही. चॅलेंज दिल म्हणून मी बोलत आहे. चॅलेंज कुणाला देताय? विधान परिषदेच्या आमदारामुळे तालुक्याची बदनामी झाली. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते, असा इशारा रणजितसिंह निंबाळकर यांनी दिला.
बहिणीच्या चारित्र्यावर संशय नको म्हणून मी बोललो नाही. तीन-चार दिवस झाले काहीच बोललो नाही म्हणून मी म्हटले की आपण बोलले पाहिजे. नाहीतर माझ्यावर संशय वाढायचा. तिन्ही भावांनी फलटणचे नाव खराब केले. आम्ही बापजाद्यांच्या पैशावर जगलो नाही. या तिघांनाही बोलवा आणि आमच्या चौघांचीही नार्को टेस्ट करा. तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल तो डॉक्टर. सगळ्यांची लाईव्ह डिटेक्टर चाचणी करा, पैसे मी भरायला तयार आहे. मेहबूब शेख आणि सुषमा अंधारे यांनाही बोलवा. मी जर दोषी असेन तर तुरुंगात जाईन, असेही निंबाळकर म्हणाले.
माफीच्या आडून जर पुन्हा आरोप झाले तर मी तुम्हाला 277 केसेस करून दाखवतो. 78 व्या वर्षी मी त्यांना जेलमध्ये बसवणार नाही. त्यांना चक्की पिसिंग करून देणार नाही. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे ही माझी कालही भूमिका होती आणि आजही आहे. हीच भूमिका उद्याही असणार आहे असेही ते म्हणाले.
Ranjitsinh Naik Nimbalkar Breaks Down in Public Meeting, Says Sushma Andhare
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
 - धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
 - मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
 - पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				
													


















