विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर: मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केला आहे.
फलटण प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत मृत महिला डॉक्टरचे चॅट समोर आणले होते. यावरून प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर यांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केले आहे. ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढे होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रूपात अडकले आहेत?
जयकुमार गोरे यांनीही मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य करत तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे यांचे लोकांनी काय काय दाखवले नाही? ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आले ते एक कोटी गोरेंकडे कसे आले हे ईडीने त्यांना विचारले. त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार. हे कोणीही मुळ भाजपचे नाहीत, ते बाहेरून आले आहेत, त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला. राज्याचा एक मंत्री असे कसे काय बोलू शकतो? समजा त्या महिलेची चॅटिंग असेल तर तुम्ही काय तिला आत्महत्या करायला लावणार का? असा संतप्त सवालही महाजन यांनी उपस्थित केला आहे.
प्रकाश महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार कोण यावर बोलणारे पाशा पटेल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाशा पटेल यांना ‘उपटसुंभ’ म्हणत महाजन म्हणाले , गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर, जेव्हा पार्थिव परळीत आणले गेले, तेव्हा धनंजय मुंडे यांनी अंत्यसंस्कार करावेत असे म्हणणारा पाशा पटेलच होता. गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल धनंजय मुंडे यांनी केलेले वक्तव्य पाशा पटेल यांना माहिती नाही का? त्यामुळे धनंजय मुंडे हे मुंडे साहेबांचे वारसदार होऊ शकत नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार ठरवण्याचा हक्क त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या ओबीसी वर्गाला आहे आणि त्यांचा खरा वारसा फक्त पंकजा मुंडेच आहेत, दुसरे कोणी नाही.
Why is Rupali Chakankar, who assassinated the character of a deceased doctor, still in office? In what form is Ajit Pawar trapped?
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
 - धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
 - मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
 - पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				
													


















