विशेष प्रतिनिधी
भाेपाळ :CM Mohan Yadav मध्य प्रदेशातील तत्कालीन शिवराजसिंह चाैहान सरकारने लाडली बहना याेजना राबविली हाेती. त्याचा माेठा फायदा हाेऊन भारतीय जनता पक्षाला सत्ता टिकविता आली. मात्र, आता या लाडली बहनानाेच राज्याला कर्जाच्या खाईत लाेटले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहून आम्ही कर्जबाजारी झाल्याची कबुली दिली आहे. CM Mohan Yadav
लाडली बहनामुळे राज्याची तिजाेरी रिकामी झाल्याने मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्यास नकार दिला आहे. तसेच केंद्राला पत्र लिहून आम्ही कर्जबाजारी झालो आहोत, तुम्हीच शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करावे, अशी मागली केली आहे. मध्य प्रदेश सरकार सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडून होणारी किमान आधारभूत किंमतीवरची धान्य आणि गहू खरेदीची जबाबदारी केंद्रावर सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून राज्यासाठी असलेल्या विकेंद्रीकृत खरेदी योजनेतून सूट देण्याची मागणी केली आहे.
http://youtube.com/post/UgkxXwchgYgonN7QvaOBABRQZQ7kDdth5LH4?si=4bTk0xg2wNRW7mR3
राज्याच्या नागरिक पुरवठा महामंडळावर तब्बल ₹७७,००० कोटींहून अधिक कर्ज आहे. गेल्या काही वर्षांत धान्य आणि गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खरेदी केलेल्या धान्याचा साठा निकाली काढण्यास मोठ्या प्रमाणात वेळ लागतो. या विकेंद्रीकृत योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या खर्चाचे वेळेवर पेमेंट न झाल्याने राज्य सरकारला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. खरेदीसाठी बँकांकडून घेतलेल्या सुमारे ₹७२,१७७ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करणे अत्यंत कठीण झाले आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारला राज्याला केंद्रीकृत खरेदी योजना चालवण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. केंद्र सरकारने हे मान्य केल्यास भारतीय खाद्य निगम आता थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांवर परिणाम नाही, सरकारचा दावाराज्य सरकारने हा बदल केला तरी शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा दावा अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी केला आहे. ते म्हणाले, आमचे सरकार शेतकरी हितैषी आहे. शेतकऱ्यांच्या मालाचा प्रत्येक दाणा एमएसपीवर खरेदी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.CM Mohan Yadav
राज्याच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी जोरदार टीका केली आहे. “हे शेतकऱ्यांशी केलेला विश्वासघात आहे. आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे राज्य सरकार दिवाळखोरीच्या मार्गावर आहे आणि आता केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे,” असा आरोप त्यांनी केला. ”
Madhya Pradesh Drowning in Debt Due to ‘Ladli Behna’ Scheme, CM Mohan Yadav Seeks Financial Aid from Centre
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















