पौड रस्त्यावरील मेट्रो स्टेशनच्या पिलरला धडकली कार, बंडगार्डन पाठोपाठ पौड रस्त्यावर अपघाताचा थरार

पौड रस्त्यावरील मेट्रो स्टेशनच्या पिलरला धडकली कार, बंडगार्डन पाठोपाठ पौड रस्त्यावर अपघाताचा थरार

विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशनला मेट्रो स्टेशनच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच असाच एक अपघात पौड रस्त्यावरील मेट्रो स्टेशन जवळ घडला. एक भरधाव कार मेट्रोस्थानकाच्या पिलरला धडकल्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने गाडीमधील एअर बॅग मुळे चालक बचावला. काही तरुण कार्यकर्त्यांनी बचाव कार्य या जखमीला तातडीने बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान एसएनडीटी मेट्रो स्टेशन समोर घडली. सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगुडे आणि त्यांचे काही मित्र कारमधून स्वारगेटच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने एक होंडा सिटी कार प्रचंड वेगात पुढे गेली आणि पौड रस्त्यावरील मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलाच्या पिलरला जाऊन जोरात धडकली. अवघ्या काही क्षणात हा अपघात घडला.

बालगुडे आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने त्यांची कार बाजूला लावली आणि बचाव कार्य सुरू केले. जखमीला तात्काळ बाहेर काढले. त्यांचे विचारपूस करून त्यांच्या मोबाईलमधून कुटुंबीयांना फोन लावला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष आणि वाहतूक पोलिसांना देखील या संदर्भात फोन करून माहिती दिली. जखमी व्यक्ती अलंकार पोलीस स्थानकाजवळील परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बहुदा कारचालकाने मद्यपान केलेले असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पौड रस्त्याकडून डेक्कनच्या दिशेने जाताना जिथे उड्डाण मेट्रोचा उड्डाणपूल सुरू होत; त्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे. दरम्यान, त्या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लोकांनी मदत करण्याऐवजी मोबाईलमध्ये शूटिंग करण्यास सुरुवात केली. हे चित्र अतिशय विदारक आणि माणुसकीला लाजवणारे असल्याची प्रतिक्रिया बालगुडे यांनी दिली. अपघातानंतर मदतीची आवश्यकता असते. जखमीला जर तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, तर त्याचे प्राण वाचू शकतात. मात्र लोक मदत करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतात आणि मोबाईलमध्ये शूटिंग काढण्यात मग्न असतात हा प्रकार निंदनीय असल्याचे बालगुडे म्हणाले.

यासोबतच अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, पोलीस, वाहतूक शाखा आदी ठिकाणी संपर्क साधण्यासाठी देण्यात आलेल्या फोन नंबर्सचा फलक लावणे आवश्यकता त्यांनी व्यक्त केली

Car crashes into metro pillar on Paud Road, another shocking accident after Bund Garden incident

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023