विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोरेगाव पार्क येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी नावाच्या कंपनीने, 1804 कोटीची महार वतनाची जमीन 300 कोटीला घेतली आहे. हाजमिनीचा व्यवहार रद्द झाला पाहिजे. हा 420 चा व्यवहार आहे. ईडी, सीबीआय झोपले आहे का? हे एवढे मोठे प्रकरण असून त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे., अधिमग्नी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. Vijay Wadettiwar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या Amadea Holdings LLP (अमेडिया होल्डिंग्स एलएलपी) नावाच्या कंपनीने, 1804 कोटीची महार वतनाची जमीन 300 कोटीला घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. हे जमीन घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. Vijay Wadettiwar
पार्थ पवारांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमिनीच्या घोटाळ्याबाबत बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंढवा येथील 16.19 हेक्टर जमीन ही महावतनाची जमीन असून त्याचे कायदेशीर वारस 300 पेक्षा जास्त आहे. 2013 मध्ये गायकवाड यांच्याकडून पॉवर ऑफ अटॉर्नी घेतला होता. विक्री झाली नव्हती, तेजवानी बिल्डरने त्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा गैरवापर केला. या जमिनीचा मूळ मालक महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. गायकवाड आणि इतर वारसदारांनी 2013 पासून तेजवानीने आमच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा चुकीचा वापर केला अशी तक्रार वारंवार केली. 2020 मध्ये फेरफार होऊन गायकवाड आणि ढाले यांचे नाव आले. कोणत्याही वारसदाराला जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळाला नाही. फक्त या जमिनीचा टॅक्स न भरल्यामुळे ती जमीन सरकार जमा करून घेतली होती. मूळ मालकाला विश्वासात न घेता, जमिनीचा टायटल क्लियर नसताना, तेजवानी बिल्डरने पॉवर ऑफ अटॉर्नीचा वापर करून पार्थ पवार आणि त्यांची भागीदारी असलेल्या कंपनीला विकली. जमिनीचे टायटल क्लियर नसताना, सातबारावर सरकारचा नाव नसताना, या जमिनीची सेल डील कशी झाली?
पार्थ पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमिनीच्या मालकाला संपर्क साधून विक्रीची मागणी केली होती. तेव्हा वारसदारांनी जमीन आमच्या मालकीची होऊ द्या, मग विक्री व्यवहार करू असे सांगितले होते. त्यामुळे पार्थ पवार आणि त्यांच्या सहकाऱ्याने अशा पद्धतीने जमीन काबीज केली. जमिनीचा हा व्यवहार रद्द झाला पाहिजे. हा 420 चा व्यवहार आहे. ईडी, सीबीआय झोपले आहे का? हे एवढे मोठे प्रकरण असून त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर असा व्यवहार होणे मोठा गुन्हा आहे. कोणी या व्यवहाराला एका दिवसात परवानगी दिली. मुद्रांक शुल्काला माफी दिली. यातून लक्षात येते की किती मोठा गैरव्यवहार सरकारी पातळीवर झाला आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
या प्रकरणी उद्योग संचालनालयावरही कारवाई झाली पाहिजे. कारण राफेलच्या स्पीडने या प्रकरणाची फाईल पुढे गेली आहे. मुंढवा परिसरामध्ये अशा पद्धतीच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्यामध्ये या संदर्भातील नियमांचे उल्लंघन केले जाते. लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून पुण्याचे अशा पद्धतीचे 50 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आले आहेत. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल या पद्धतीने पुण्यात बुडवला गेला आहे. घोटाळा झालेल्या या जमिनीचा आजचा बाजार दर 1800 कोटी आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे, सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही या प्रकरणी दुर्लक्ष करणार का? की यावर कारवाई करणार आहात? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. घोटाळा करून असा काही घोटाळा केला नाही असे पार्थ पवार आता वरून बोलतात. म्हणूनच या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सुद्धा वडेट्टीवारांकडून करण्यात आली आहे.
Mahar Watan land worth ₹1,804 crore sold for ₹300 crore! Is ED, CBI asleep? asks Vijay Wadettiwar
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















