Ajit Pawar : पक्षाची प्रतिमा खालावणाऱ्यांना मायनस करावे लागेल, पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर अजित पवार बरसले

Ajit Pawar : पक्षाची प्रतिमा खालावणाऱ्यांना मायनस करावे लागेल, पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर अजित पवार बरसले

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar  काही प्रवक्ते पक्षाची प्रतिमा उंचावण्याऐवजी खालावण्याचे काम करत आहेत. त्यांना आता मायनस करावे लागेल अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर बरसले. महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील यांच्या वादाच्या संदर्भातून अजित पवारांनी या कानपिचक्या दिल्याची चर्चा होती.Ajit Pawar

मुंबई येथील वरळी येथे महापालिका निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी काही पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. पुण्यात सध्या रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद सुरू आहे. रूपाली पाटील यांच्याकडून चाकणकर यांच्यावर टीका केली जात आहे.Ajit Pawar



या संदर्भातून अजित पवार म्हणाले, पक्षी भूमिका आणि ध्येय धोरणे मांडण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रवक्त्यांची नियुक्ती आहे. पण काही भगिनी ते विसरल्या आहेत. स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्याकडून वक्तव्ये केली जात आहेत. थांबायचे नावच त्या घेत नाहीत. यामुळे पक्षाची प्रतिमा उंचावण्याऐवजी खालावली जात आहे. त्यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. या प्रवक्त्याना मायनस करावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुण्यातील दोन महिला नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसुंदी समोर आली आहे. मात्र पक्षाच्या वरिष्ट नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त होत नव्हती. आता थेट अजित पवार यांनीच भाष्य केल्याने कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar lashes out at Pune women spokespersons, says those tarnishing party’s image will be sidelined

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023