विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव याच्यावर शिवसेना शिंदे गट युवासेनाच्या उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपनीत बांधकामाच्या ठेक्यावरून वाद झाला आणि त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विक्रांत जाधव आक्रमकपणे समोरील व्यक्तीच्या अंगावर धावून जात असताना दिसत आहे. Bhaskar Jadhav
स्थानिकांना काम देण्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने आले. यावेळी विक्रांत जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सचिन काते यांना माझ्या कामगारांना काम थांबवण्यास सांगायचे नाही, असे सांगितले. तसेच, तुमचा मंत्री आहे म्हणून तुम्ही वाट्टेल ते करणार का? असा प्रश्न यावेळी विक्रांत जाधव यांनी उपस्थित केला. तर, याचवेळी विक्रांत जाधवांनी काही लोकांची नावे घेत तुम्ही त्यांची कामे बंद करणार का?
तुम्ही संतोष यांची फॅक्टरी बंद पाडणार का? असेही प्रश्न विक्रांत जाधव यांनी काते यांना विचारले. पण फॅक्टरी बंद करण्याचा प्रश्न येत नाही, असे कातेंनी प्रत्युत्तरात म्हटले. पण काते तुमचा आणि माझा काही संबंध नाही, तुम्ही माझ्या वादात पडू नका. तुम्ही माझ्या कामगारांना काम बंद करायला सांगायचे नाही, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते कंपनीशी बोलायचे असे विक्रांत जाधवांनी कातेंना म्हटले. पण लेबर तुमचे असतील पण काम कंपनीचे आहे, असे सचिन काते यांनी म्हणताच विक्रांत जाधव आक्रमक झाले आणि त्यांच्या अंगावर धावून गेले.
फिर्यादी सचिन काते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजय केमिकल कंपनीत स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी करत असताना अचानक वाद निर्माण झाला. त्यानंतर विक्रांत जाधव, सुमित शिंदे, विवेक आंब्रे व त्यांच्यासोबत आलेल्या आणखी सात ते आठ जणांनी काते यांच्यावर हल्ला करून मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोटे परिसरात खळबळ उडाली आहे. खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Dispute Over Construction Contract: Case Filed Against Bhaskar Jadhav’s Son for Assault
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar : पक्षाची प्रतिमा खालावणाऱ्यांना मायनस करावे लागेल, पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर अजित पवार बरसले
- पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले ‘काम नसेल करायचं तर पदं सोडा’
- पार्थ पवार यांच्या जमिनीबाबत तक्रार आली की चौकशी सुरू करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण
- Ambadas Danve : तुम्हाला का सर्व फुकट लागते? कोरेगाव पार्क जमिनीच्या व्यवहारावरून अंबादास दानवे यांचा अजित पवारांना सवाल


















