विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. हा व्यवहार रद्द झाला असला अहवालात जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.Chief Minister
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जी माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हा जो काही करार त्यांनी केला होता, त्यात पैशांची देवाण-घेवाण बाकी होती. परंतु, रजिस्ट्री झाली होती. दोन्ही पक्षांनी रजिस्ट्री रद्द करावी, असा अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरायचे असतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात. त्यामुळे तशी नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे. त्यामुळे पुढची कारवाई जी होणार आहे ती होईल. तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती याने संपणार नाही. त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत, त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.Chief Minister
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, यासोबतच आम्ही एक समिती स्थापन केली असून एक महिन्यात अहवाल मागवला आहे. याची किती व्याप्ती आहे, यात कोण कोण आहे याची माहिती घेतली जाणार आहे. या संदर्भात पोलिसांनी देखील कारवाई केली असून दोघांना अटक करण्यात आले आहे. सगळ्या प्रकारची चौकशी केली जाणार आहे, यात कोणालाही सोडले जाणार नाही. जो काही घटनाक्रम समोर येत आहे, त्याच्या तळाशी पोलिस जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याची संपूर्ण माहिती आल्यावरच यावर भाष्य करणे योग्य राहील, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही, असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. यात जी कंपनी आहे, या कंपनीचे जे अधिकृत सिग्नेटरीज आहेत त्यांच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो. पण लक्षात घेतले पाहिजे, ज्यावेळेस एखादा एफआयआर होतो त्यावेळेस ज्यांनी सही केले ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी फेरफार केला ते, ज्यांनी चुकीचे रजिस्ट्रेशन केले ते, अशा सगळ्यांवर हा एफआयआर दाखल केलेला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
अजित पवारांचा यात संबंध आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहवाल येऊ द्या, अहवालात जो कोणी दोषी असेल, जो कोणी आणि माझ्या या मताशी किमान अजित पवार सुद्धा सहमत असतील की या अहवालात कोणीही दोषी आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी.
Action will be taken in Koregaon Park land scam case, assures Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















