Uddhav Thackeray : दगाबाज सरकारचा पंचनामा करा, आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्होटबंदी करा: उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Uddhav Thackeray : दगाबाज सरकारचा पंचनामा करा, आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्होटबंदी करा: उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

जालना : Uddhav Thackeray  शेतकऱ्यांनी दगाबाज सरकारचा पंचनामा करावा आणि जोपर्यंत सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्होटबंदी करावी, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहेUddhav Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची शनिवारी सांगता झाली. चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सरकारने त्यांना नेमकी काय मदत केली? जे पॅकेज सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केले आहे. त्यातील किती पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहे, याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली.

जालना येथे पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, या दौऱ्यामध्ये मी दोन गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या आहेत. पंचनामे झालेले नाहीत. खासदार संजय जाधव यांच्या इथे तर एका तहसीलदाराने सांगितले की तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा. पण त्या तहसीलदाराचाही तो नाईलाज असेल. कारण वरूनच काही देण्याक आलेले नाही मग तो तरी काय करणार. पण तहसीलदार जर का मग्रुरीने वागत असेल तर मला वाटते की त्या तहसीलदाराला उचलून मुख्यमंत्र्यांकडे न्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातले पाहिजे. कारण त्यांनी जो काही आव आणला आहे. जे काही सोंग आणले आहे, ते किती बोगस आहे. हे सरकार कसे दगाबाज आहे, या सरकारचे पॅकेज कसे बकवास आहे, हे मी या दौऱ्याच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ठाकरेंनी म्हटले.

तसेच, मी शेतकऱ्यांना दोन कार्यक्रम सांगितले आहेत. पहिला म्हणजे, शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल. म्हणजेच, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यातील कर्जमुक्ती ही झाली पाहिजे. 50 हजार प्रति हेक्टरी मिळाले पाहिजेत. पण त्या पलिकडे किंवा ते बाजूला ठेवले तरीदेखील सरकारने जी काही घोषणा केली आहे. त्याचे वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत किंवा ज्यांनी कोणी पंचनामे केले आहेत त्यांनी पंचनामे केले आहेत की नाही, केले असतील तर ते रिपोर्टवर पाठवले की नाही. रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही, हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल, असे ठाकरेंनी सांगितले.

तर, दुसरी गोष्ट अशी की, निवडणूक आल्यानंतर फसवी आश्वासन दिली जातात, खोट्या थापा मारल्या जातात. मग ते लाडक्या बहिणीचे असेल किंवा कर्जमाफीचे असेल. आता तुम्ही पाहिले की, नुकसान भरपाईसाठी ज्याच्या नावावर जमीन आहे, त्यांना दूरवर केव्हायसी करण्यासाठी यावे लागते. अनेकदा सर्वर डाऊन म्हणून परत जावे लागते. सर्व गोष्टी पाहिल्यानंतर जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती, तशी शेतकऱ्यांनी व्होटबंदी करावी, असे आवाहन मी शेतकऱ्यांना करत असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सर्व जात, पात बाजूला ठेऊन तुम्ही शेतकरी म्हणून एक व्हा, तुम्हाला जोपर्यंत मदत मिळत नाही, कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50 हजार मिळत नाही, वाहून गेलेल्या शेतीसाठी माती मिळत नाही, बी-बीयाणे मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजपा प्रणित आणि त्यांच्या कुबड्यांना व्होटबंदी म्हणजे मतबंदी करा, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्याच्या माध्यमातून केले आहे.

Uddhav Thackeray Urges Farmers to Boycott Voting Until Government Fulfills Its Promises

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023