विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shashi Tharoor काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्याचे कौतुक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी थरूर यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय आणि सार्वजनिक कारकिर्दीचे विशेष कौतुक केले आहे.Shashi Tharoor
अडवाणींच्या ९८व्या वाढदिवसानिमित्त थरूर यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “त्यांच्या अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाकडे केवळ एका घटनेच्या आधारावर पाहणे हे अन्यायकारक ठरेल. जसे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कारकीर्द केवळ चीन युद्धातील पराभवावरून ठरवता येत नाही किंवा इंदिरा गांधींची कारकीर्द केवळ आणीबाणीच्या निर्णयावरून मोजता येत नाही, त्याचप्रमाणे अडवाणी यांच्या कार्याकडेही निष्पक्षतेने पाहिले पाहिजे.”Shashi Tharoor
थरूर यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून काहींनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले तर काहींनी टीका केली.
अडवाणींच्या कार्याबद्दल बोलताना थरूर म्हणाले, “लालकृष्ण अडवाणींना ९८व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. सार्वजनिक जीवनातील त्यांची वचनबद्धता, नम्रता आणि शालीनता अनुकरणीय आहे. आधुनिक भारताच्या घडणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांचे आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.”
थरूर यांनी यापूर्वीही विरोधी पक्षातील नेत्यांविषयी कौतुकाचे सूर लावले होते. यावेळी त्यांच्या अडवाणींवरील प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
“Unfair to Judge a Long Career by a Single Event,” Says Shashi Tharoor Praising Lal Krishna Advani’s Contributions
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















