Eknath Shinde : महायुती धर्माला तिलांजली, शिंदे गटाचा भाजपवर संताप, आक्रमक भूमिका घेण्याची शिंदेंकडे मागणी

Eknath Shinde : महायुती धर्माला तिलांजली, शिंदे गटाचा भाजपवर संताप, आक्रमक भूमिका घेण्याची शिंदेंकडे मागणी

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली : Eknath Shinde  डोंबिवलीत रविवारी झालेल्या भाजपच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर महायुतीतील तणाव पुन्हा उफाळून आला आहे. भाजपने शिंदे शिवसेनेतील नगरसेवक व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय राजेश कदम यांनी समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर थेट निशाणा साधला आहे.Eknath Shinde

राजेश कदम म्हणाले, “दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ स्तरावर ठरले होते की, शिंदे शिवसेनेतील पदाधिकारी व नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला जाणार नाही आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे शिवसेनेत घेतले जाणार नाही. मात्र, रविवारी डोंबिवलीत भाजपने हा मौखिक करार धाब्यावर बसवला आणि महायुती धर्माला तिलांजली दिली. त्यामुळे आता आमचेही संयमाचे दिवस संपले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक पक्ष प्रवेश मोहिम सुरू करून भाजपप्रमाणेच प्रत्युत्तर द्यावे.”Eknath Shinde



भाजपचा पक्ष प्रवेश कार्यक्रम डोंबिवली जिमखाना येथे पार पडला, ज्यामध्ये शिंदे शिवसेनेचे काही माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि महिला बचतगट सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. विशेषतः, माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांच्या तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश शिंदे शिवसेनेला फार जिव्हारी लागला आहे. वामन म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटाशी असलेला दीर्घकाळचा संबंध सर्वांना माहित असतानाही भाजपने त्यांना पक्षात घेतल्याने शिंदे गटात असंतोष पसरला आहे.

या प्रकारानंतर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी असून, भाजपवर “युती धर्माचे उल्लंघन” केल्याचा आरोप होत आहे. “जर भाजप महायुतीच्या ठरावाचा आदर ठेवत नसेल, तर शिंदे शिवसेनाही आता संयम सोडून आपली ताकद दाखवेल. भाजपच्या इच्छुकांना पक्षात घेऊन आमचा पक्ष विस्तार करेल,” असा स्पष्ट इशारा राजेश कदम यांनी आपल्या समाजमाध्यमातील पोस्टमधून दिला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये “महायुती टिकणार का?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य पातळीवर युती दृढ असल्याचे सांगितले असले, तरी स्थानिक स्तरावर मतभेद उघडकीस येत आहेत.

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पक्ष आपला गोट मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि तणाव वाढत आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, “भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यातील परस्पर अविश्वासाचे संकेत आता उघडपणे दिसू लागले आहेत. दोन्ही पक्ष स्थानिक स्वार्थासाठी आपली ताकद तपासत आहेत, आणि त्यामुळे महायुतीच्या ऐक्याला तडा जाऊ शकतो.”

दरम्यान, या वादावर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, शिंदे गटाने आता “संयम नव्हे, संघर्ष” अशी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुती टिकेल की तुटेल, हे येत्या आठवड्यातील डोंबिवलीतील राजकीय हालचालींवर अवलंबून असेल.

Shinde Camp Angered as BJP ‘Betrays Mahayuti Alliance’; Supporters Urge Eknath Shinde to Take an Aggressive Stand

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023