गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन, रोहित पवार यांचा राज्य सरकारवर आरोप

गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन, रोहित पवार यांचा राज्य सरकारवर आरोप

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांवर*राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोपांचा भडिमार केला. Rohit Pawar

रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की, “राज्य सरकारने ‘गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन’ देण्याची नवी योजना सुरू केली आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर जमिनींचे व्यवहार म्हणजे भ्रष्टाचाराचा नवा उद्योग सुरू झाला आहे.” Rohit Pawar

ते पुढे म्हणाले,“नवी मुंबईत एकनाथ शिंदे गटाने ५,००० कोटी रुपयांच्या सिडको जमिनींचा गैरव्यवहार केला, पुण्यात भाजपने १,८०० कोटींच्या जैन बोर्डिंगच्या जमिनीवर डोळा ठेवला, तर संभाजीनगरमध्ये शिंदे गटाने एमआयडीसीची राखीव जमीन हडपली. याच वेळी अजित पवार गटाने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ३०० कोटींची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला.”



रोहित पवार यांनी आणखी आरोप करत सांगितले की, “अहिल्यानगरमध्ये जैन समाजाची जमीन अजित पवार गटाने बेकायदेशीररीत्या हस्तगत केली, तर नवी मुंबई विमानतळाजवळ ३,००० कोटी रुपयांचा गौण खनिज उत्खनन घोटाळा झाला आहे. मुंबईत तर भाजपनं एसआरएच्या जमिनी लाटण्याचं काम सुरू ठेवलं आहे.”

त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत म्हटलं,“या तीनही पक्षांनी म्हणजे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे व नियमांना पायदळी तुडवले आहे. प्रशासनाचा गैरवापर करून शासकीय जमिनी बेकायदेशीररीत्या हस्तगत केल्या जात आहेत. सरकारच्या या ‘जमीन योजना’मुळे लोकांचा विश्वासच उडाला आहे.”

रोहित पवार यांनी सरकारवर ‘मत चोरी करून सत्ता मिळवली आणि आता जमिनींची लूट सुरू केली’ असा आरोप करत म्हटलं की,“या सरकारचा उद्देश जनतेचा विकास नसून, सत्तेचा गैरवापर करून वैयक्तिक फायद्यासाठी सरकारी संपत्ती लाटणे हा आहे. सत्तेत येताना जनतेला दिलेल्या वचनांचा विसर पडला असून, आता भ्रष्टाचाराचे नवे रेकॉर्ड तयार होत आहेत.”

Bail for Criminals, Land for Leaders — Rohit Pawar Accuses Maharashtra Government of Massive Land Scams

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023